Abhishek Ghosalkar Firing Live Update : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल, दोघं पोलिसांच्या ताब्यात, तपास गुन्हे शाखेकडे
Abhishek Ghosalkar Death Live Update : शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार करण्यात आला होता.

Background
Abhishek Ghosalkar Death Live Update : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर (Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं.
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर प्रकरणात अमरिंदर मिश्रावर गुन्हा दाखल
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या प्रकरणात अमरिंदर मिश्रावर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या शस्त्राने अभिषेक यांच्यावर गोळी झाडण्यात आली ते शस्र त्यांचं होतं. त्यामुळे शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला त्यांच्या धाकट्या भावाने अग्नी दिला
Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या पार्थिवाला त्यांचा धाकटा भावाने अग्नी दिला आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिसने नोरोन्हा याने गुरुवारी (दि.9) गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर मॉरिसने स्वत:वरही फेसबुक लाईव्ह करत गोळ्या झाडून घेतल्या. त्यानंतर दोघांचाही मृत्यू झाला होता.
























