Dadachi Shala Pune:  रस्त्यावर राहून सिग्नलवर वस्तू विकून दोन वेळचे जेवण मिळविणाऱ्या या मुलांनाही शिक्षण मिळावे, यासाठी मी तरुणाने पुढाकार घेतला आहे. दररोज रस्त्यावर फिरून काही पैसे कमविणाऱ्या या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना देखील इतर मुलांप्रमाणे शिक्षण मिळावे. यासाठी मी 'दादाची शाळा' सुरु केली आहे, असं अभिजित पोखर्णीकर सांगतो.


अभिजीत पोखर्णीकर पुण्यातील पदपथावर राहणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवतो. अनेक परिसरात त्याने शाळा सुरु केल्या आहेत. किमान 300 विद्यार्थी त्याच्या शाळेत आहे. पुण्यातील सिग्नलवर अनेक लहान मुलं वेगवेगळ्या वस्तुंची विक्री करताना दिसतात. त्याच विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम अभिजीत करतो आहे.


अभिजित हा मुळचा पुण्याचा आहे. लहानपणापासूनच धडपडा आणि प्रयोग करण्याची आवड त्याला दादाच्या शाळेपर्यंत घेवून आली. पुण्यात प्रत्येक सिग्नलवर आपण अनेकदा लहान मुलं बघतो. त्याच मुलांच्या शिक्षणाची धुरा या अभिजितने हाती घेतली आहे. या सगळ्यांमध्ये त्याला अनेकांचं सहकार्य लाभलं आहे. 300 हून अधिक विद्यार्थी वेगवेगळ्या परिसरातून गोळा केले आणि त्यांचं भविष्य उज्वल करण्याचा विडा उचलला.  मार्केट यार्ड, सारसबाग आणि झेड ब्रिजच्या खाली नदीपात्रात, विश्रांतवाडी या परिसरात ही शाळा भरते. प्रत्येक विद्यार्थांचा शिक्षणाकडेच नाही तर त्यांना व्यक्तिमत्व विकासाकडेसुद्धा लक्ष दिले जाते. 



मुलांना गोळा करणं किंवा त्याच्या पालकांना शिक्षण किती महत्वाचं आहे हे पटवून देणं खूप अवघड काम आहे. आम्ही भिक्षा मागतो आमची मुले ही तेच करणार किंवा आम्ही फुले विकतो आमचा मुलगा ही तेच करणार ही पालकांची मनस्थिती बदलण्यासाठी बराच त्रास सहन करावं लागतो. त्याचप्रमाणे काही पालक मुलाची इच्छा असून सुद्धा मुलांना शिक्षणासाठी सोडत नाही . काही मुले व्यसनाच्या आहारी गेली असतात तर काही मुले चोरी करत असतात त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शिक्षण हा च एक पर्याय आहे, असं अभिजीतने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.


पुण्यात एकूण बारा हजाराहून अधिक पाथरीक मुलं आहेत. अनेक शहरांतून, राज्यातून पुण्यात व्यवसायासाठी स्थलांतरीत झाले आहे. यातील अनेक पालक रस्त्यांवर वेगवेगळ्या वस्तू विकण्याचा व्यवसाय करतात. तर अनेक पालक पुण्याच्या मार्केट यार्ड सारख्या परिसरात वेगवेगळे पारंपारिक व्यवसाय करतात. यांच्या मुलंही तेच काम करताना दिसतात. बारा हजाराहून अधिक मुलं शिक्षणापासून वंचित आहे. ही संख्या फार मोठी आहे. त्यामुळे दादाची शाळा हा त्यांच्यासाठी शिक्षण घेण्याचा उत्तम पर्याय आहे.




"मला वाटलं की माझ्यासारखीच अनेक मुलं शिक्षित व्हावी म्हणून मी एक अनोखी मोहीम म्हणजेच दादाची शाळा सुरु केली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादाची शाळा म्हणजे काय तर प्रत्येकाच्या जीवनात असा एक वाढीलधारा व्यक्ती असतो मग ती आपली ताई असेल आई असेल किंवा वडील हे सर्व आपल्याला लहानपणा पासून शिक्षणाचं महत्व सांगत असतात व आपल्या शिक्षणात नेहमी मदत करत असतात तसाच ह्या दादाच्या शाळेत बराच सयंसेवक आहेत जे विनामूल्य व गुणवत्ता शिक्षण घेण्यासाठी स्त्रोत नसलेल्या अनिवासी व पथारीक मुलांसाठी काम करतात मी स्वतः लहानपाणी रस्त्यावरच्या शाळेत शिकलो आहे जिथे माझ्या काही ओळखीचे शिक्षक मला शिकवत असे नंतर मी खूप वेगळ्या गोष्टी शिकत गेलो कॉलेजचा अभयास करताना UNO ला जॉईन झालो त्याच्या बैठका (Conference)भाग घेऊ लागलो  मग समजलं आपल्या  देश मध्ये शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि शिक्षणच असं पर्याय आहे जे लहान मुलं आणि युवा पिढीला पुढे घेऊन जाऊ शकतं", असं मत अभिजीतने व्यक्त केलं आहे.


पालक काय म्हणाले?
आम्ही मार्केट यार्ड परिसरात फुलांचा व्यवसाय करतो. माझ्यामुलीला लहान दोन मुलं आहे. तिच्यासारखीच परिस्थीती माझ्या नातवंडावर येवू नये म्हणून मला माझ्या नातवंडांना शिक्षण द्यायचं आहे. मात्र आम्हाला शाळेचा खर्च परवडणारा नाही त्यामुळे मुलांना आम्ही शिक्षण देवू शकत नाही. मात्र आता दादाच्या शाळेत ही मुलं जायला लागली आहे. मलाही वाटतं की माझ्या नातवंडांनी मोठं व्हावं मात्र परिस्थिती माझ्यापुढे कायम आ फाडून असते. आता मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे. त्यामुळे यांचं भविष्य कदाचित उज्वल होईल, अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.