Pune-Indapur News: भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा भाजप आणि केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून झाला असल्याचे वारंवार सूचित केले व चाललेल्या रस्त्यांच्या कामाचा दर्जा हा उत्तमरीत्या करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा सज्जड दमच त्यांनी भरला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज पालखी राष्ट्रीय महामार्ग टप्पा क्रमांक दोन वरती पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते.



केंद्रात व राज्यात आता आपली सत्ता असल्याचे सांगत पाटील यांनी यावेळी कार्यक्रमात अधिकारी वर्गांना खडे बोलत सुनावले. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत मंत्रीपद हे मिरवायला नसते तर जनतेची कामे करावे लागतात. मी तालुक्याचा आमदार आहे आणखी जास्त विकास निधी आणून तालुक्याचा कायापालट करणार असल्याचे यावेळी सांगितले.



इंदापूर तालुक्यातील गोतोंडी येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते हर्षवर्धन पाटील,  राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे हे एकाच मंचावर होते. यावेळी दोघांनी एकमेकांवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सध्या सगळे निर्णय घेत आहेत. मंत्रीपद मिळाल्यावर जनतेची कामं करावे लागतात. आज मी मंत्री नाही आहे मात्र अनेकांनी म्हटलं पाहिजे की दत्तात्रय भरणे यांनी रस्ता केला. उपाययोजना राबवल्या. गल्ली पासून सगळीकडे विकास केला अशी आपल्या पदाची नोंद झाली पाहिजे, असं दत्तात्रय भरणे म्हणाले