एक्स्प्लोर

धुळ्यात अभाविपच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जची चौकशी करु : अब्दुल सत्तार

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं वाहन अडवलं. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता. आता या लाठीचार्जची चौकशी करु असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं

धुळे : धुळ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करु, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची पत्रकार परिषदेत दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, यासह इतर मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (26 ऑगस्ट) धुळ्यात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं वाहन अडवलं. यानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला होता.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी पालकमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी केली होती. मात्र पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी भेट नाकारल्याने संतप्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बैठकीसाठी येत असलेल्या अब्दुल सत्तार यांचं वाहन जिल्हा परिषद कार्यालयासमोर अडवलं. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पालकमंत्र्यांच्या वाहनासमोरुन हटवून वाहनाचा रस्ता मोकळा केला.

दरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करत धुळे पोलिसांवर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपचे आमदार राम सातपुते यांनी केली होती. तर हा लाठीचार्ज अब्दुल सत्तार यांच्या सांगण्यावरुनच करण्यात आल्याचा आरोप अभाविपचे महाराष्ट्र प्रदेश मंत्री स्वप्निल बेगडे यांनी केला आहे. यानंतर पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांनी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी करु, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली.

अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या काय होत्या? कोरोनाचा फटका शैक्षणिक वर्तुळाला बसला आहे. राज्यात परीक्षेसंदर्भात देखील मोठा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थींना झालेल्या नुकसानीची जबाबदारी घेऊन, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली होत. यासोबतच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या एकूण शुल्कापैकी 30 टक्के शुल्क सरसकट माफ करावे. तसंच मार्च ते जून महिन्यातील वसतिगृह, खानावळ शुल्क, बस शुल्क शंभर टक्के परत करावेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत 10 टक्के प्रवेश शुल्क घेऊन प्रवेश प्रक्रिया सुरु करावी आणि उर्वरीत शुल्क चार टप्प्यात घेण्यात यावे, अशा विविध मागण्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या केल्या होत्या.

दरम्यान आंदोलन करणाऱ्यांपैकी सहा विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.

ABVP Protest | अभाविपच्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्यांसाठी अब्दुल सत्तारांची गाडी अडवली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
जयंत पाटील माझे मामा, पण...; भाजप प्रवेशानंतर काय म्हणाले प्राजक्त तनपुरे, सुप्रिया सुळेंच्या भेटीचंही सांगितलं
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
पक्षनिधी अन् पार्थ-भुजबळ वादावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, काल एक व्हिडिओ माझ्याकडे आला
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..
मोठी बातमी! प्राजक्त तनपुरेंचा भाजपात प्रवेश, मामा जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले आमच्यासाठी..

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shekhar Suman Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला
Video: मेलोनीला मेलोडी खाऊ घालत मेलोडीची किंमत वाढवली, माननीय मोदीजी तसाच रुपया हातात घेऊन फोटो काढा, काय माहीत कदाचित रुपयाची किंमत वाढेल; शेखर सुमनचा खोचक टोला, 'काॅकरोच'वरूनही तुफानी टोलेबाजी
Bihar Politics : कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
कितीही ताकद लावा, फोर्स बोलवा, पण बंगला सोडणार नाही; राबडी देवींचं बिहार सरकारला खुलं आव्हान
RBI Repo Rate : आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
आरबीआय रेपो रेट वाढवणार की जैसे थे ठेवणार? वर्षाअखेरीस मोठ्या निर्णयाची शक्यता, गृहकर्ज महागणार?
Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
मनोज जरांगेंच्या आंदोलनस्थळी किती गर्दी? वाहनांच्या रांगा, आंदोलकांकडून रास्ता रोके, पाहा फोटो
Delhi Police: दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
दिल्लीत आयएसआयच्या 9 एजंटांना अटक; धार्मिक स्थळे आणि सरकारी इमारतींवर हल्ला करण्याचा कट उधळला, दादर रेल्वे स्थानकाची केली होती रेकी, भारतीय सूत्रधारांचा शोध सुरू
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Video: राजस्थानात वाळूच्या वादळानं थरकाप, भरदिवसा काळोख माखला, रस्त्यांवरील वाहने जागेवर थांबली; वेग ताशी 70 किमी अन् 30 मिनिटांचे तांडव
Rahul Gandhi on CUET UG : दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
दावा विश्वगुरू असल्याचा, पण एकही परीक्षा नीट घेता येत नाही; CUET परीक्षेच्या गोंधळावरुन राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
Mumbai Crime News : क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
क्रूरतेचा कळस! भुकेने रडणाऱ्या दुधासाठी हट्ट करणाऱ्या 4 वर्षांच्या चिमुरड्याला बापाने भिंतीवर आपटलं अन्...; घटनेनं पवई हादरली
Embed widget