CM Eknath Shinde In Kolhapur : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती करण्यात आली. यावेळी कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसर राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराज उपस्थित होते. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, तर प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले . मुख्यमंत्र्यांसमवेत उद्योग मंत्री उदय सामंत तसेच आमदार महेश शिंदे यांचेही आगमन झाले. 


यावेळी खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबिटकर, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, यांच्यासह इतर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.


कणेरी मठात होणारा 'सुमंगलम' महोत्सव आहे तरी काय?


सुमारे 1350 वर्षांपेक्षा अधिक काळ अध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ कणेरी यांच्याकडून कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'सुमंगलम' (sumangalam) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर (panch mahabhoot) आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होणार आहे. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरूप असेल. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशभरातील सात ते आठ  राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपाल, शेकडो विद्यापीठांचे कुलगुरु, तीन हजारांवर साधू संत, शेकडो शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील तज्ज्, डाॅक्टर उपस्थित राहणार आहेत. 


'सुमंगलम' हा महोत्सव 500 एकर परिसरात होणार आहे. यासाठी जगभरातून 30 लाख लोकांची उपस्थिती असेल, असा संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत वाजता पंचगंगा घाट येथे आज होत आहे. बोधचिन्हाची निर्मिती स्वच्छता अभियान लोगोचे निर्माते अनंत खासबागदार व शिरीष खांडेकर यांनी केली आहे. पंचगंगा घाटावर पर्यावरणपूरक हजारो गोमय पणत्‍या प्रज्वलित करून उत्सवाच्या तयारीची मुहुर्तमेढ रोवली जाणार आहे. तसेच पंचमहाभूत तत्वांशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व उत्सवाच्या थिम सॉंगचेही अनावरण होणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या