kolhapur News : सुमारे 1350 वर्षांपेक्षा अधिक काळ अध्यात्मिक व सामाजिक परंपरा लाभलेल्या श्री सिद्धगिरी मठ कणेरी यांच्याकडून कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'सुमंगलम' (sumangalam) महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पृथ्वी, पाणी, हवा, तेज, आकाश अशा पंचमहाभूतांवर (panch mahabhoot) आधारित भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वैश्विक पर्यावरण संवर्धनासाठी हा महोत्सव होणार आहे. परिषद, प्रदर्शन व प्रवर्तन असे या सोहळ्याचे स्वरूप असेल. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. देशभरातील सात ते आठ राज्यांचे मुख्यमंत्री तसेच राज्यपाल, शेकडो विद्यापीठांचे कुलगुरु, तीन हजारांवर साधू संत, शेकडो शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातील तज्ज्, डाॅक्टर उपस्थित राहणार आहेत.
'सुमंगलम' हा महोत्सव 500 एकर परिसरात होणार आहे. यासाठी जगभरातून 30 लाख लोकांची उपस्थिती असेल, असा संयोजकांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या उपस्थितीत वाजता पंचगंगा घाट येथे आज होत आहे. बोधचिन्हाची निर्मिती स्वच्छता अभियान लोगोचे निर्माते अनंत खासबागदार व शिरीष खांडेकर यांनी केली आहे. पंचगंगा घाटावर पर्यावरणपूरक हजारो गोमय पणत्या प्रज्वलित करून उत्सवाच्या तयारीची मुहुर्तमेढ रोवली जाणार आहे. तसेच पंचमहाभूत तत्वांशी संबंधित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन व उत्सवाच्या थिम सॉंगचेही अनावरण होणार आहे.
'सुमंगलम' महोत्सव आहे तरी काय?
- महोत्सवात एकूण 1 हजार स्टॉल उभारणार
- प्रत्येक राज्यातील कमीत कमी दोनशे पर्यावरणवादी, अभ्यासू लोकांचा सहभाग
- दोनशे डॉक्टर मिळून आयुर्वेदीक गॅलरी उभारणार व त्याबाबत माहिती देणार
- देशी बीजांचे एकत्रित प्रदर्शन भरवणार
- पार्किंगच्या ठिकाणी चारचाकी, दुचाकी मेस्त्री, पंक्चर सेवा
- महोत्सव व पार्किंगसाठी 500 एकर जागा
- एक हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देशभरातील छोट्या अवजारांचे प्रदर्शन
- गृहिणी व बेरोजगारांसाठी कुटिरोद्योगांचे प्रदर्शन
- स्वयंसेवकांसाठी स्वतंत्र ॲपची निर्मिती
इतर महत्वाच्या बातम्या