एक्स्प्लोर
Advertisement
औरंगाबादमध्ये भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू
औरंगाबाद-पैठण रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. यात एक युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत.
औरंगाबाद : औरंगाबाद-पैठण रोडवर दुचाकी आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. यात एक युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. नाजिम शेख असं मृत युवकाचं नाव आहे.
हा अपघात एवढा भयानक होता की दुचाकीवरील दोघे जण अक्षरश: हवेत फेकल्या गेले. या अपघातात नाजिमचा जागीच मृत्यू झाला. नाजिम आणि सलमान हे दोघे जण दुचाकीवरुन पैठणकडे निघाले होते. त्यावेळी राहुलनगर येथे दुचाकी आणि कारची समोरसमोर जोरदार धडक झाली.
नाजिमच्या दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने त्याला समोरुन येणाऱ्या कारचा अजिबात अंदाज आला नाही. त्यामुळे कार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement