Shirdi Sai Mandir : शिर्डीतील साई मंदिराच्या (Sai Mandir Shirdi) वादाचा तिढा अद्याप कायम आहे. मंदिरात हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी उठणार का याकडं सर्व साई भक्तांचं लक्ष लागलं होतं. मात्र, याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतरच पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.
साई मंदिरात फुलं, प्रसाद नेण्यावर बंदी घातली आहे. मंदिरात फुलं, हार आणि प्रसाद नेण्यावरुन जोरदार गोंधळ झाला होता. काल स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांकडून शिर्डीतील साईबाबा मंदिरात हारं-फुलं नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी संस्थानाचे सुरक्षा रक्षक आणि फुलं विक्रेत्यांमध्ये झटापट झाली होती. याच पार्श्वभूमीवर आज साई संस्थान, स्थानिक विक्रेते आणि ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर ते बोलत होते.
महिनाभर परिस्थिती जैसे थे
दरम्यान, या प्रकरणी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीत सीईओ तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि डीडीआर यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे. समितीचा अहवाल एक महिन्यात सादर होणार आहे. जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत परिस्थिती जैसे थे राहणार आहे. म्हणजे किमान एक महिना तरी अजून साई मंदिरात हार, फुले आणि प्रसाद वाहता येणार नाही.
जनभावनाचा आदर झाला पाहिजे हीच मुख्यमंत्र्यांची भावना
दरम्यान जनभावनाचा आदर झाला पाहिजे हीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना असल्याचे विखे पाटील म्हणाले. आजच्या बैठकीत फुल उत्पादक आणि संस्थान यात करार करण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांची कंपनी स्थानप करावी अशी सूचना समोर आल्याचे त्यांनी सांगितले. फुल विक्रेत्यांकडून साई भक्तांची लूट होत होती आशा तक्रारी आल्या होत्या. मूळ उत्पादकांना लाभ मिळाला पाहिजे. शिर्डी गुन्हेगारीचा अड्डा बनायला नको असेही विखे पाटील म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: