Pune Ganeshotsav 2022: पुण्यात यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव (Pune Ganeshotsav 2022) जल्लोषात साजरा होणार आहे. त्यामुळे पुण्यातील गणपती मंडळ आणि ढोल ताशांच्या (Dhol tasha group) पथकाल कमालीचा उत्साह बघायला मिळत आहे. याच उत्साहाने मात्र पुण्यात ध्वनीप्रदुषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं समोर आलं आहे. गणेशोत्सवासाठी दैनंदिन ढोल ताशा पथकाच्या सरावाचा आवाज हा अनंत चतुर्दशी उत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाइतकाच असतो, असं कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पुणे (coep college) ने केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील ढोल ताशांच्या सरावामुळे होणाऱ्या ध्वनीप्रदुषणाचा मुद्धा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ढोलताशांच्या आवाजामुळे रक्तदाब वाढतो, हृदयाची धडधड होण्याचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. दरवर्षी गणपतीच्या दिवशी सरासरी 90 डेसिबल आवाजाची नोंद होते. यंदा ढोलताशांच्या सरावातून निर्माण होणाऱ्या आवाजाचे रेकॉर्डिंग करून अहवाल तयार करण्यात आला आहे. सुहास पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत नांदोडे आणि सुयोग लोखंडे या विद्यार्थ्यांनी ढोलपथकांचा सराव असलेल्या ठिकाणांचा, परिसरातील नागरी वसाहती आणि रुग्णालयांजवळचा अभ्यास केला.
त्यावेळी ढोल वाजवणाऱ्या मुला-मुलींच्या कानात दररोज सरासरी 80 ते 90 डेसिबल आवाज येत होता. उत्साहाच्या वेळी त्याची तीव्रता जाणवत नसली तरी या आवाजाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. तसेच या संघांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश असल्याने ही अधिक चिंतेची बाब असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
नदीपात्रात सर्वात जास्त सराव
पुण्यातील डेक्कन परिसरातील नदीपात्रास अनेक ढोल ताशा पथकांचा सराव रोज सुरु असतो. किमात तीन ते चार तास प्रत्येक पथक ढोल वादन करत असतात. या आवाजामुळे पेठेतील नागरीकांना त्रास होतो. गेली अनेकवर्षा स्थानिक आणि नजीकचे नागरीक यासंदर्भात आवाज उठवतात मात्र गणपतीचे दिवस आले की हा आवाज जैसे थे होतो. गेली अनेक वर्ष पेठेतील नागरीक या आवाजामुळे त्रस्त आहे. मात्र यावर अजूनही काहीच तोडगा काढला जात नाही आहे.
शाळा आणि रुग्णालयाची शांतता भंग
या परिसरात जवळ पुना हॉस्पिटल आहे. हे पुण्यातील नामवंत हॉस्पिटल आहे. मात्र याच हॉस्पिटलच्या आवारात संध्याकाळी जोरात ढोलताशा पथकाचा सराव केला जातो. यामुळे रुग्णांना त्रास होतो आणि ध्वनीप्रदुषण देखील होतं.