News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

पहिला पेपर उद्या सकाळी 11 ते 2 वाजताच्यादरम्यान इंग्रजी विषयाचा होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. राज्यातील एकूण नऊ मंडळातून जवळपास 14 लाखांच्या वर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

FOLLOW US: 
Share:
मुंबई : राज्यात आजपासून (21 फेब्रुवारी) बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. पहिला पेपर आज सकाळी 11 ते 2 वाजताच्यादरम्यान इंग्रजी विषयाचा होणार आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. राज्यातील एकूण नऊ मंडळातून जवळपास 14 लाखांच्या वर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ मंडळांमार्फत बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यामध्ये 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी तर 6 लाख 48,151 विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान आणि किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात 2957 परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. तसेच पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे. बेस्टकडून विशेष सवलत बेस्ट बसकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत जाहीर करण्यात आली आहे. परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना घर ते परीक्षा केंद्रापर्यंत मोफत प्रवास करता येणार आहे. बेस्टने याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. विद्यार्थी परीक्षेचे हॉलतिकीट दाखवून परीक्षा केंद्रापर्यंत प्रवास करु शकतात. तसंच परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढील दरवाजाने गाडीत प्रवेश करण्याची मुभाही देण्यात आली आहे.
Published at : 20 Feb 2019 09:38 PM (IST) Tags: english exam hsc students

आणखी महत्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आय लव्ह यू मॉम-डॅड...; दिव्यांग तरुणीने शेवटची भावना तळहातावर लिहिली, गळ्याला दोर लावत जीवनयात्रा संपवली, घटनेनं नाशिक हादरलं!

Nashik Crime News: आय लव्ह यू मॉम-डॅड...; दिव्यांग तरुणीने शेवटची भावना तळहातावर लिहिली, गळ्याला दोर लावत जीवनयात्रा संपवली, घटनेनं नाशिक हादरलं!

BMC Election 2026 Samadhan Sarvankar: भाजप असं करेल वाटलं नव्हतं, 'त्या' टोळीमुळे माझा पराभव; समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप

BMC Election 2026 Samadhan Sarvankar: भाजप असं करेल वाटलं नव्हतं, 'त्या' टोळीमुळे माझा पराभव; समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप

Maharashtra Live blog: मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या गटनेते पदी आश्रफ आझमींच्या नावावर शिक्कामोर्तब

Maharashtra Live blog: मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या गटनेते पदी आश्रफ आझमींच्या नावावर शिक्कामोर्तब

Mumbai Water Cut Alert : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! तब्बल 44 तास पाणीपुरवठा बंद; नेमकं कोणत्या भागात 'पाणीबाणी'?

Mumbai Water Cut Alert : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!  तब्बल 44 तास पाणीपुरवठा बंद; नेमकं कोणत्या भागात 'पाणीबाणी'?

Palghar Protest Long March: 1500 नको नोकऱ्या द्या, वाढवण, मुरबे प्रकल्प रद्द करा; पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्च आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

Palghar Protest Long March: 1500 नको नोकऱ्या द्या, वाढवण, मुरबे प्रकल्प रद्द करा; पालघरमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाँग मार्च आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

टॉप न्यूज़

NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध

NCP: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांच्या आमदाराचा एकत्र येण्याला विरोध

Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार

Devendra Fadnavis Maharashtra Jobs: दावोसमध्ये महाराष्ट्राला गुंतवणुकीचं घबाड गवसलं, 15 लाख नोकऱ्या मिळणार, पहिल्याच दिवशी मोठे करार

Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली

Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल