मुंबई : भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक व्हर्गिस कुरियन यांचे निधन आजच्या दिवशी झाले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली होती ते रशियन तत्वज्ज्ञ आणि लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा 9 सप्टेंबर रोजी जन्म झाला होता. तर आजच्याच दिवशी 1920 मध्ये मुस्लिम विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 


1776 : अमेरिकेची नव्याने ओळख


महासत्ता असलेल्या अमेरिकेची 9 सप्टेंबर 1776 पासून नव्याने ओळख निर्माण झाली. अमेरिकेचे जुने नाव युनायटेड कॉलनीज् बदलून यूनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असं ठेवण्यात आलं. 


1942 : क्रांतीवीर शिरीष कुमार यांचे निधन 


शिरीषकुमार यांचा जन्म महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नंदुरबार या छोट्याशा गावात झाला. लहानपणापासूनच शिरीष कुमार आपल्या आईकडून स्वातंत्र्यलढ्याच्या कथा ऐकत असत.आझाद हिंद फौजेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांचा शिरीष कुमार यांच्यावर चांगला प्रभाव होता असं म्हटलं जातं. त्यांनी 1942 मध्ये भारत छोडो चळवळीत देखील भाग घेतला होता. त्यावेळी ते अवघ्या 16 वर्षांचे होते. या चळवळीवर पोलिसांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले होते. याच चळवळीमध्ये त्यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता. 


1920 : अलिगड मुस्लिम विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा


मुस्लिम समाजामध्ये आधुनिक सुधारणा आणण्यासाठी सर सैय्यद अहमद खान यांनी 1875 साली अलिगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना केली. आजच्या दिवशीच, सुमारे 1920 रोजी अलिगड मुस्लिम विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला होता. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हे ब्रिटिश काळात उच्च शिक्षण मिळण्याचं प्रमुख केंद्र होतं. 'लोकांना ते शिकवा जे त्यांना माहिती नाही' 


1950 : संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म


जेष्ठ मराठी गायक आणि संगीतकार सुधीर फडके यांचे पुत्र श्रीधर फडके यांचा 9 सप्टेंबर रोजी जन्म झाला. श्रीधर फडके यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण हे मुंबईच्या डीजी रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. सांगितीक वारसा असल्यामुळे  त्यांच्यावर लहानपणापासूनच संगीताचे संस्कार मिळाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली. आजही श्रीगणेशाची आराधना करताना ज्या गाण्याने सुरुवात केली जाते त्या ॐकार स्वरूपा या गाण्याला श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलं आहे. त्यांच्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर कायमच राज्य केलं आहे. लक्ष्मीची पाऊले या चित्रपटापासून श्रीधर फडके यांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. 


1965 : तिबेट चीनचा स्वायत्त प्रांत बनला


चिनने तिबेटवर ताबा मिळवल्यानंतर आजच्या दिवशी तिबेटला आपला स्वायत्त प्रांत बनवला. तिबेट स्वायत्त प्रदेशाच्या सध्याच्या सीमा साधारणपणे 18 व्या शतकात स्थापन करण्यात आल्या आहेत. 


1974 : कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म


विक्रम बत्रा हे भारतीय सेनादलातील एक अधिकारी होते. कारगिलच्या युद्धामध्ये ते शहीद झाला. तर त्यांच्या पराक्रमाबाबत त्यांना भारताचा सर्वोच्च मरणोत्तक परमवीरचक्र पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 9 सप्टेंबर 1974 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या अतुलनिय कामगिरीसाठी प्रत्येक भारतीय त्यांचा कायम अभिमान वाटत राहील. 


इतर महत्त्वाच्या घडामोडी : 


1791: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवण्यात आले.


1828 : लिओ टॉलस्टॉय यांचा जन्मदिन  


1850: आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक भारतेंदू हरिश्चंद्र यांचा जन्म. 


1997 : ७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळाला.


2012: भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण केले.