एक्स्प्लोर

9 महिलांचा अवैध गर्भपात, सोलापूर जिल्ह्यात आणखी एक रॅकेट उघड

अवैध गर्भपात प्रकरणी माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉक्टर विजयसिंह भगत आणि मेडद येथील डॉक्टर सुखदेव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर : अवैध गर्भपात प्रकरणामुळे सोलापूर जिल्हा चर्चेत असताना आणखी एक असंच प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील अकलूज येथे 36 अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर गांधी दाम्पत्याची चौकशी सुरु आहे. त्यातच आता माळशिरस परिसरात 9 महिलांच्या अवैध गर्भपात प्रकरणी दोन डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील डॉक्टर विजयसिंह भगत आणि मेडद येथील डॉक्टर सुखदेव कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कुणकुण लागताच दोन्ही डॉक्टर हॉस्पिटलला कुलूप ठोकून पळून गेल्याने आता पोलिसांनी त्यांचा शोध घेणं सुरु केलं आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी, खुळेवाडी, उंबरे दहिगाव परिसरातील 9 महिलांचा अवैध गर्भपात केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सिव्हिल सर्जन डॉक्टर मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी माळशिरस पोलीस ठाण्यात भादंवि 312 , 201 आणि वैद्यकीय गर्भपात अधिकार 1971 ( 5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ही गर्भपाताची प्रकरणं 9 ऑगस्ट 2016 ते 13 जानेवारी 2017 या पाच महिन्यांच्या कालावधीतील आहेत. त्यामुळे या प्रकरणांचा शोध लावण्याचं पोलिसांसमोर आता आव्हान आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्हा राज्यातील अवैध गर्भपातामुळे चर्चेत होता. अकलूज आणि आता माळशिरस येथे सापडलेल्या 2 रॅकेटमुळे जिल्ह्यात अजून किती दवाखान्यात असे अवैध गर्भपाताचे प्रकार सुरु आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या :

अकलूज बनले 4 जिल्ह्याचे गर्भपात केंद्र?

अकलूजमध्ये 36 महिलांचा गर्भपात करणारं डॉक्टर दाम्पत्य अटकेत

महत्त्वाच्या बातम्या

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 
याद रखना, हिसाब होगा! राहुल गांधींचा आवाज दाबता येणार नाही, संघर्ष आणखी तीव्र होणार, हर्षवर्धन सपकाळ आक्रमक 

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget