7th June In History: इतिहासापेक्षा चांगला शिक्षक कोणीच असू शकत नाही. इतिहासात केवळ घटनांचा समावेश नसतो, तर या घटनांमधून तुम्हाला खूप काही शिकता येते. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालशी 7 जूनचा खूप खोल संबंध आहे. वास्तविक शहाजहानची पत्नी मुमताज महल हिचे 7 जून रोजी निधन झाले. मुमताज महलने बुरहानपूरमध्ये 14 व्या मुलाला जन्म देताना अखेरचा श्वास घेतला. तिच्या स्मरणार्थ शहाजहानने यमुनेच्या काठावर आग्रा येथे प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहलची निर्मिती केली. मुमताज महलच्या नावावरून त्याला ताजमहाल असे नाव देण्यात आले.


देशाच्या आणि जगाच्या इतिहासात ७ जून या तारखेला नोंदवलेल्या इतर घटनांची मालिका पुढीलप्रमाणे आहे.


1539 - बक्सारच्या लढाईत शेरशाह सूरीने हुमायुनचा पराभव केला.


7 जून 1539 साली बक्सरच्या जवळ चौसा या ठिकाणी अफगाण शासक शेरशाह सुरी आणि मुघल शासक बादशाहा हुमायू यांच्यात झालेल्या लढाईत शेरशाह सूरीने बादशाहा हुमायूनचा पराभव केला.


1557 - इंग्लंडने फ्रान्सविरुद्ध युद्ध घोषित केले.


1631 - शहाजहानची पत्नी मुमताज महलचे निधन


मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज बेगम (Mumtaz Mahal) हिचा मृत्यू 7 जून 1631 रोजी झाला. 14 व्या मुलाच्या जन्मादरम्यान मुमताजचे वयाच्या 39 व्या वर्षी निधन झाले. मुमताज आणि शहाजहानला चौदा मुले होती, ज्यात जहाँआरा बेगम (शाहजहानची आवडती मुलगी) आणि क्राऊन प्रिन्स दारा शिकोह आणि आलमगीर औरंगजेबचा समावेश आहे. दारा शिकोहला मारून 1658 मध्ये औरंगजेब सहावा मुघल सम्राट म्हणून त्याच्या वडिलांच्या गादीवर आला. मुमताज महलच्या स्मरणार्थ शहाजहानने यमुनेच्या काठावर आग्रा येथे प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहलची (Taj Mahal) निर्मिती केली. मुमताज महलच्या नावावरून त्याला ताजमहाल असे नाव देण्यात आले.


1780 - लंडनमधील कॅथलिक विरोधी दंगलीत सुमारे 100 लोक मारले गेले.


1893 - महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत प्रथमच सविनय कायदेभंगाचा वापर केला.


1967 - इस्रायली सैन्याने जेरुसलेममध्ये प्रवेश केला


इस्त्रायल आणि अरब देशांमध्ये झालेल्या सिक्स डेज वॉर म्हणजे सहा दिवसांच्या युद्धात (Six-Day War) 7 जून 1967 रोजी इस्त्रायल्या सैन्याने जेरुसलेममध्ये प्रवेश केला. सहा-दिवसीय युद्ध हे जून युद्ध या नावानेही ओळखले जाते. 1967 अरब-इस्त्रायली युद्ध किंवा तिसरे अरब-इस्रायल युद्ध (Arab–Israeli War or Third Arab–Israeli War)  5 ते 10 जून 1967 दरम्यान इस्रायल आणि अरब राष्ट्रांच्या (प्रामुख्याने इजिप्त, सीरिया आणि जॉर्डन) यांच्यात लढले गेले. यामध्ये सुरुवातील मागे पडलेल्या इस्त्रायलने नंतर मुसंडी (Israeli–Palestinian conflict)  मारून तीनही अरब देशांचा दारून पराभव केला होता. 


1971 - जागतिक आरोग्य संघटनेने तत्कालीन पूर्व पाकिस्तानला लागून असलेल्या भारताच्या सीमावर्ती भागात कॉलरामुळे तीन हजार लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली.


1674- टेनिस जगतात भारताची ख्याती मिळविणारे महेश भूपती (Mahesh Bhupathi) यांचा जन्म.


1979 - भारताचा दुसरा उपग्रह भास्कर पहिल्या सोव्हिएत युनियनच्या बियर्स लेकवरून अवकाशात सोडण्यात आला.


1981 : हिंदी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म.


अमृता राव  ही बॉलिवूड चित्रपटसृष्टीमधील उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने विवाह, इश्क विश्क, मै हू ना, वेलकम टू सज्जनपूर अशा अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले आहे. अमृता राव विवाह आणि इश्क विश्क या सिनेमांमुळे विशेष प्रकाशझोतात आली. तसेच तिला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.


1995 - अमेरिकेचा नॉर्मन थागार्ड अंतराळ कक्षेत सर्वात जास्त काळ जगणारा अंतराळवीर बनला.


1997 - महेश भूपती ग्रँड स्लॅम टेनिस विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला.


2000 - अमेरिकेच्या न्यायालयाने मायक्रोसॉफ्ट कंपनीला दोन भागांमध्ये विभागण्याचे निर्देश दिले.


2004 - इस्रायली कॅबिनेटने गाझा परिसरातून वसाहती हटवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.


2006 - भारताने नेपाळच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी एक अब्ज रुपये देण्याचा निर्णय घेतला.


2006 - जॉर्डन वंशाचा इराकी अतिरेकी अबू मुसाब अल-झरकावी अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मारला गेला. इराकमधील अल कायदा या कट्टरपंथी इस्लामिक संघटनेचा तो स्वयंभू प्रमुख होता.


2017- म्यानमार हवाई दलाचे विमान अंदमान समुद्रात कोसळले, 112 जणांचा मृत्यू झाला.