7th June Headlines: आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहे. आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीचा अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे कडवं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत होणार आहे. 



WTC चा अंतिम सामना 


आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 



पालखी सोहळा 


-  त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे. पालखी सिन्नर तालुक्यातून जाणार असून दातली गावी आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजता दरम्यान रिंगण सोहळा होणार आहे.


- शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे.  


राष्ट्रीय 


हरियाणा - फोगाट बहिणींच्या बलाली गावात आज महापंचायत. कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट उपस्थित राहणार



दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता बैठक होणार



मुंबई 


- शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेल वर सुरू करण्यात येत आहे 


-   मुंबई-गोवा महामार्गावर (एनएच-66) मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर मुळचे कोकणातील असलेले अॅड. ओवैस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


-  राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी


पुणे  


- जेजुरी विश्वस्त निवडीवर आज धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. सध्या ग्रामस्थांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे. 
- जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांच्या नियुक्तीवरून वाद सुरु असताना या विश्वस्तांन एकत्र येत त्यांची भुमिका पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत. 


नवी मुंबई 


- तिरुमला तिरुपती देवस्थानम श्री व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिर, नवी मुंबई भूमिपूजन समारंभ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत
 


अहमदनगर 


- कथित लव जिहाद प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सहा प्रकरण घडल्याच किरीट सोमय्यांचा दावा आहे. 


- भाजप खासदार सुजय विखे पाटलांची पत्रकार परिषद


- शिर्डीमध्ये काँग्रेस विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे कॅनॉल पाणी जलपूजन असून संध्याकाळी 4 वाजता सभा होणार 


 सांगली 


- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जत तालुक्यात 55 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता.