एक्स्प्लोर

बीडमध्ये राष्ट्रवादीला 'धस'का, 7 सदस्यांचा भाजपला पाठिंबा?

बीड : बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुरेश धस यांचे पाच सदस्य भाजपला मदत करणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे उद्या (21 मार्च) होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक रंगतदार होणार आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण सुरेश धस यांची समजूत काढण्यास राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना अपयश आल्याची माहिती आहे. सुरेश धस यांची नाराजी का? बीड जिल्ह्याचं नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांनाच पक्षाकडून बळ दिलं जात असल्याचा धस यांचा आरोप आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सदस्य निवडून आणण्यात धस यांचाही मोठा वाटा आहे. धनंजय मुंडे यांचं नेतृत्व सुरेश धस यांना मान्य नसल्याचं बोललं जात. त्यामुळेच त्यांनी धनंजय मुंडे यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. भारतभूषण यांचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा रात्री उशीरा दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने बीड पंचायत समितीमध्ये संदीप क्षीरसागर यांच्या नावे व्हीप बजावून क्षीरसागरांना घरातूनच आव्हान निर्माण केलं होतं. याचाच राग म्हणून भारतभूषण यांनी राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. भाजपचं संख्याबळ किती? सुरेश धस यांचे समर्थक 7 सदस्य भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे एकूण 24 सदस्य निवडून आले आहेत. मात्र काँग्रेसचे 2 सदस्य राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ शकतात. तर काँग्रेसच्या निवडून आलेल्या एकूण 3 सदस्यांपैकी 1 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची माहिती आहे. भाजपचे एकूण 19 आणि एक भाजप पुरस्कृत असं 20 एवढं संख्याबळ आहे. सुरेश धस यांचे 7, काँग्रेस 1 आणि शिवसंग्रामच्या चार सदस्यांचाही भाजपला पाठिंबा असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपचं संख्याबळ 32 च्या आसपास असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यात पाठिंब्याबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणली होती, असं बोललं जातं. दरम्यान बीड जिल्ह्यात भाजपसाठी नेहमी आव्हान असणाऱ्या राष्ट्रवादीमध्ये यानिमित्ताने मोठी दुफळी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जागा कमी असताना जिल्हा परिषदेवर झेंडा फडकावण्याचं आव्हान बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर असेल. बीड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल – एकूण जागा- 60
  • राष्ट्रवादी- 25
  • भाजपा- 19
  • काँग्रेस- 03
  • शिवसंग्राम- 04
  • शिवसेना- 04
  • काकू-नाना आघाडी- 03
  • गोपीनाथ मुंडे आघाडी- 01 (भाजपा पुरस्कृत)
  • अपक्ष- 01 ( राष्ट्रवादी पुरस्कृत)

महत्त्वाच्या बातम्या

पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
पाच हजार रुपयात दिवाळी साजरी करुन दाखवा, मंत्र्यांना आणि आमदारांना पाच हजार गिफ्ट देतो, सरकारच्या मदतीवरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Embed widget