7 February Headlines : आज सुप्रीम कोर्टात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात प्रकरण चौथ्या क्रमांकावर आहे. याबरोबरच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे. शिवाय चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 


महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी
 
आज सुप्रीम कोर्टात महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या कामकाजात प्रकरण चौथ्या क्रमांकावर आहे.


आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदार संघात  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम
 
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मच्छीमारांच्या वतीने भव्य सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी भाजपचे आणि शिंदे गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.


चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस


चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून अश्विनी जगताप यांनी अर्ज भरला आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्यापही कोणाचचं नाव जाहीर करण्यात आलं नाही. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनाही अडून बसली होती. सेनेच्या नाराजीमुळंच अद्याप हे नाव जाहीर केलं नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चिंचवडची जागा घड्याळाच्या चिन्हावर लढली जाणार असून अर्ज भरण्यासाठी मी स्वत: उपस्थित रहाणार असल्याचं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं आहे.  राहुल कलाटे आणि नाना काटे या दोघांच्या नावांची सध्या चर्चा सुरू आहे. पण उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळं सस्पेंन्स आजूनही कायम आहे.


अमरावतीत विशाल हिंदू धर्म सभेचे आयोजन 
 
अमरावतीत आज विशाल हिंदू धर्म सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. डॉ. प्रवीण तोगडिया यांचे दुपारी 12 वाजता अमरावती येथे आगमन होणार असून ते विविध ठिकाणी भेटी देऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत.


माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस


आज माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस आहे. या निमित्ताने संगमनेरमध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेवर


युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेवर आहेत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. आदित्य ठाकरे निफाड ते औरंगाबाद असा प्रवास करणार  आहेत. या प्रवासात ते शिवसैनिक आणि नागरिकांशी साधणार संवाद साधणार आहेत. 
 
 कृषी पदवीधरांच्या आंदोलनाचा 14 वा दिवस


राज्यातील कृषी विद्यापीठातील कृषी पदवीधरांच्या आंदोलनाचा आजचा १४ दिवस आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा परीक्षेतील केलेल्या बदलांमुळे कृषी अभियंत्याच हे आंदोलन सुरू आहे. आमच्या ताटातील घास काढून घेतला गेला आहे अशी एक भावना पदविधारकांनी व्यक्त केलीय. 


 चंद्रशेखर बावनकुळे यांची पत्रकार परिषद      


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील भाजप कार्यालयात  ही पत्रकार परिषद होणार  आहे. 


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज विवाहबंधनात अडकणार 


अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी आज विवाहबंधनात अडकणार आहेत. राजस्थान येथील जैसलमेरच्या सूर्यगढं पॅलेसमध्ये दोघांच लग्न होईल.