एक्स्प्लोर

कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ

कर्जमाफीचे ऑनलाईन फॉर्म भरुन देण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत याआधी 15 सप्टेंबर 2017 होती.

मुंबई : शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत 22 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्यापर्यंत फॉर्म भरणं आवश्यक होतं. आतापर्यंत तब्बल 44 लाख शेतकऱ्यांचे अर्ज भरण्याचं बाकी आहे. त्यामुळे आजही अनेक शेतकरी सुविधा केंद्राच्या रांगेत उभं राहून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करत आहेत. कर्जमाफीसाठी आतापर्यंत (14-09-2017 पर्यंत) 96 लाख 59 हजार 740 अर्जाची नोंदणी झाली आहे. तर 49 लाख 56 हजार 305 शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत याआधी 15 सप्टेंबर 2017 होती. सरकारने 7 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. मात्र फॉर्म भरताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. तर अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. धुळ्यात शहरी भागातील ग्राहक सेवा केंद्रात 4-4 दिवस नंबर लागत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. तिकडे बीड, परभणी आणि लातूरमध्येही थोड्याफार फरकाने हिच स्थिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी कर्जमाफीची रक्कम मिळेल असं आश्वासन दिलं आहे. मात्र आता मुदत वाढवल्याने वेळेत अर्जांची छाननी होऊन शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी कर्जाची रक्कम मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच कर्जाची रक्कम देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करु, असं आश्वासन सुभाष देशमुख यांनी दिलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Maharashtra Live blog updates: राज्यात लवकरच मेगापदभरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसंकडून पदभरतीला मान्यता
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
Ajit Pawar Plane Crash: व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
व्हीएसआर विमान कंपनीच्या मालकाचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन, पिंकी माळीच्या कुटुंबाला धमक्या, अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप
Nashik Gas Shortage: गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत; 100 हून अधिक कंपन्यांकडे फक्त एक दिवसाचा साठा, कंपन्या बंद ठेवण्याची वेळ
गॅस टंचाईने नाशिकमधील उद्योग अडचणीत; 100 हून अधिक कंपन्यांकडे फक्त एक दिवसाचा साठा, कंपन्या बंद ठेवण्याची वेळ

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Embed widget