6th March Headlines : पीएमपीएल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा आज संप आहे. अचानक पुकारलेल्या संपामुळे बस गाड्यांची संख्या आज कमी असण्याची शक्यता आहे. या संपाचा पुणेकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. याबरोबरच भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असलेला होळीचा सण आज देशभरात साजरा होणार आहे.
आज देशभर होळीचा उत्साह, कोकणातही पहायला मिळणार पारंपारीक होळीची परंपरा
भारतीय संस्कृतीत विशेष महत्व असलेला होळीचा सण आज देशभरात साजरा होणार आहे. कोकणातही मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
रामदास कदम यांची पत्रकार परिषद
कालच्या खेडच्या सभेनंतर आज सकाळी साडेनऊ वाजता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना होणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेवर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची पत्रकार परिषद होणार आहे.
पुण्यासाठी पी एम पी एल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा संप
पी एम पी एल बस गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांचा आज संप आहे. अचानक पुकारलेल्या संपामुळे पी एम पी एल बस गाड्यांची संख्या आज कमी असण्याची शक्यता आहे. अचानक केलेल्या संपामुळे नागरिकांचे हाल होतील. तीन महिन्यांपासूनचे बिल थकल्यामुळे चार ठेकेदारांनी अचानक संप पुकारला आहे.
नाशिकचे शेतकरी कृष्णा डोंगरे कांदा पीक जाळणार
नाशिकच्या येवला तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे आज सकाळी 11 वाजता कांदा पिकाला अग्निडाग देणार आहेत. आधी होळी साजरा करणार आणि त्यांनतर दीड एकरावरील कांदा पीक जाळणार. कांद्याला भाव नाही सरकार दखल देत नाही त्यामुळे कांदा पीक जाळून टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
खासदार इम्तियाज जलिल यांच्या साखळी उपोषणाचा तिसरा दिवस
औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर नको या मागणीसाठी खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषध
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सकाळी 9.45 वाजता पुण्यात पत्रकार परिषद होणार आहे.
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची सीबीआय कोठडी संपणार
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांची आज सीबीआय कोठडी संपणार आहे. त्यामुळे दुपारी दोन वाजता सिसोदिया यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. नाविद, आबिद आणी साजिद या हसन मुश्रीफांच्या मुलांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. राजकीय दबावापोटी केंद्रीय तपासयंत्रणेच्या माध्यमातून दबाव टाकला जात असल्याचा याचिकेतून दावा करण्यात आलाय.
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रा उत्सवाला सुरुवात
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथील यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे. सकाळी नऊ वाजता कैकाडी समाज्याची मानाची काठी मंदीराच्या कळसाला भेटवून तर सायंकाळी गोपाळ समाजाची मानाची होळी पेटवल्यानंतर मढी यात्रेस प्रांरभ होणार आहे. जिल्ह्यासह राज्यातून हजारोच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र मढी येथे दर्शनासाठी येत असतात.
काँग्रेसचे आंदोलन
अदानी समूहातील गैर कारभाराची हिडणाबर्ग अहवालाची संसदीय समितीच्या मार्फत चौकशी करावी, एलआयसी, स्टेट बँक व अन्य वित्तीय संस्थांमधील गुंतवणुकीची चर्चा व्हावी यासाठी काँग्रेसच्या वतीनं भंडाऱ्यात मोहाडी येथील स्टेट बँकेच्या समोर आंदोलन करण्यात येणार आहे.