चंद्रपूरच्या ताडोबा अभयारण्यात 62 वाघ!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2017 05:47 PM (IST)
प्रातिनिधिक फोटो
NEXT
PREV
चंद्रपूर : बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी ताडोबा जंगलातील वन्यप्राण्यांची गणना झाली. यावेळी ताडोबामध्ये तब्बल 62 वाघांची नोंद करण्यात आली आहे.
बुद्धपोर्णिमेला ताडोबामध्ये काही प्राणीप्रेमी आणि वन्य अधिकाऱ्यांनी चंद्राच्या प्रकाशात जंगलातील वाघांची संख्या मोजली होती. ज्यामध्ये 35 वाघ हे कोर झोनमधले तर 27 वाघ हे बफर झोनमधले होते.
वाघांशिवाय ताडोबा जंगलात कोर झोनमध्ये 4 हजार 497 वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. तर बफर झोनमध्ये 2 हजार 737 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.
या गणनेदरम्यान, दुर्मिळ श्रेणीतील खवल्या मांजर, चांदी अस्वल आणि उडणारी खार यांची नोंद करण्यात आली. तसेच भेडकी, चौसिंगा, निलगाय, लंगूर, अस्वल, शेपट्टीवर पट्टा असलेली मांजर, उदमांजर, सायळ, मुंगुस, मोर, ससा आदी ४४९७ वन्यजीवांची नोंद वन्यजीव प्रेमींनी केली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -