एक्स्प्लोर

शिक्षणाला वय नसतं ! सोलापुरात 61 वर्षांच्या आजी दहावीच्या परीक्षेला

सांगोला (सोलापूर) : शिक्षणाला वय नसतं. माणूस आयुष्यभर विद्यार्थीच राहतो, असे म्हणतात. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कस्तुराबाई महामुनी. कस्तुराबाईंचं लहानपणी बालविवाहामुळे पहिल्या इयत्तेपासूनच शिक्षण संपले आणि मागे लागला दुर्दैवाचा फेरा. दुसऱ्या इयत्तेत दाखल होताच त्यांचा बालविवाह करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने नियतीने त्यांना एका पाठोपाठ धक्के देण्यास सुरुवात केली. वयाच्या 11 व्या वर्षी आई-वडिलांचं छत्र हरवलें. त्यानंतर एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिल्यावर आयुष्यात आनंदाचे क्षण येण्यास सुरुवात झाली. मात्र दुर्दैव पाठ सोडायला तयार नव्हतं. वयाच्या 18 व्या वर्षी कस्तुराबाई याना वैधव्य आलं. संपूर्ण आयुष्य कोसळल्याच्या भावना असताना त्यांनी मुलांसाठी जिद्द बांधली आणि सुरु झाली नियतीशी दोन हात करण्याची लढाई. ...आणि नापासांची शाळा गाठली ! अतिशय कठोर कष्ट आणि जिद्दीतून त्यांनी मुलाला पदवीधर केलं. मुलीलाही शिकविलं. दोघांची लग्न लावून दिली. आता दोघेही सुखाने संसार करत आहेत. पण लढण्याची जिद्द कस्तुराबाई यांनी सोडली नाही. त्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करू लागल्या. नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकू लागली. पण आता त्यांना आपल्या अल्प शिक्षणामुळे आपल्याला आयुष्यात कोणतीच प्रगती न करता आल्याची खंत बोचत होती. शिक्षण घेतल्यास अंगणवाडीत मदतनीसच्या ऐवजी सेविका बनण्याचे त्यांनी ठरवले. मात्र याला दहावी पास असणे आवश्यक असल्याने मुले आणि नातवंडांच्या प्रेरणेतून कस्तुराबाई यांनी गाठली पंढरपूर येथील नापासांची शाळा. या शाळेत शिक्षण घेत यंदा दहावीचा फॉर्म भरला आणि आता त्या नियमितपणे सांगोल्यातून परीक्षा देण्यासाठी पंढरपूरमध्ये येऊ लागल्या आहेत. वयाची साठी ओलांडल्यानंतर संसाराचे पाश तोडून महिला पोथ्या-पुराणे आणि देवाच्या नामस्मरणात आयुष्य व्यतीत करीत असतात. मात्र 61 व्या वर्षी देखील कस्तुराबाई दहावीचा जोरदार अभ्यास करण्याच्या मागे लागल्या आहेत. दहावीचे इंग्रजी, शास्त्र, गणित हे विषय या वयात समजून घेणे खूपच कठीण असले, तरी मनातील शिक्षण घेण्याची उर्मी आणि जिद्द या सर्व अडचणींवर मात करून त्यांना अभ्यासासाठी अधिक सजग बनवत आहे. आपल्या नातीपेक्षाही लहान मुला-मुलींच्या सोबत पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येताना त्यांना कसलाच कमीपणा वाटत नाही. उलट पेपर संपल्यावर नापासांच्या शाळेतील शिक्षक भैय्या सर यांच्याकडून आपले काही चुकले का, याची तपासणी देखील या आजीबाई तेवढ्याच उत्साहाने करून घेत असतात. नापासांच्या शाळेमुळे कस्तुराबाई यांच्यासारख्या कितीतरी शिक्षणापासून दूर गेलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग गवसला असून, आज या शाळेत नियतीच्या फेऱ्यांमुळे बाजूला फेकल्या गेलेल्या त्यांच्या सारख्या कितीतरी वयस्कर पुन्हा शिक्षणाच्या ओढीने अशा परीक्षा देताना दिसत आहेत. जिद्द आणि उमेद असेल तर चांगल्या कामासाठी वयाची बंधनेही गाळून पडतात आणि 61 व्या वर्षी देखील कस्तुराबाई यांच्या सारख्यांना आपल्या आयुष्याचे ध्येय आणि समाधान गाठता येते.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget Session 2026: विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा 293 च्या प्रस्तावावरती चर्चा, पाहा सर्व अपडेट्स...
Maharashtra Budget Session 2026: विधानसभेत आज सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचा 293 च्या प्रस्तावावरती चर्चा, पाहा सर्व अपडेट्स...
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Maharashtra Government Veterinary Health System: राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहणार
राज्यभरातील पशुवैद्यक आणि पशुधन पर्यवेक्षक सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत; शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभं राहणार
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा
Israel vs Iran War Live Updates: इराण युद्धानंतर पेट्रोल संपणार असल्याची अफवा, नांदेड पाठोपाठ परभणीत पेट्रोल पंपावर रांगा

व्हिडीओ

Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report
CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
मोठी बातमी! प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे ऑडिट होणार; शालेय शिक्षण विभागाचा निर्णय; नेमकं कारण काय?
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
Embed widget