एक्स्प्लोर

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 607 कोटी रूपयांच्या आराखड्याला मंजुरी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या तीर्थक्षेत्र आराखडा समितीने आज रायगड किल्ल्याच्या विकासासाठी 607 कोटी रूपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे. या विकास कामांसाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. रायगड किल्ला जतन, संवर्धन आणि पर्यटन विकास आराखडा, म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा, लोणार (बुलडाणा) पर्यटन विकास आराखडा, माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा या राज्यातील चार पर्यटन विकास आराखड्यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पर्यटन विकास आराखडा तयार करताना पर्यटकांसह स्थानिकांच्याही सोयी-सुविधांचा प्राधान्याने विचार करावा. तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्याच्या कामाचे नियोजन आणि दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावे. रायगड किल्ल्यावरील कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. रायगड किल्ला जतन, संवर्धन आणि पर्यटन विकास आराखडा रायगड किल्ला जतन, संवर्धन आणि पर्यटन विकास आराखडा 607 कोटी रुपयांचा असून पर्यटकांना/नागरिकांना किल्ल्यांचा इतिहास जिवंत करुन दाखवण्यासाठी शिवसृष्टीसारख्या सुविधा निर्माण करण्यात येतील. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पध्दतीने डेब्रिज काढणे आणि उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पध्दतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा समावेश या आराखड्यात करण्यात आला आहे. म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा औरंगाबाद जिल्ह्यातील म्हैसमाळ, वेरुळ, खुलताबाद, सुलीभंजन पर्यटन विकास आराखडा 43844.20 लाख रुपयांचा आहे. यामध्ये रस्ते विकास, सुलीभंजन आणि म्हैसमाळसाठी पाणी पुरवठा, मल:निस्सारण, लघू प्रकल्प बांधकाम/साठवण क्षमता वाढवणे, धर्मशाळा बांधणे आणि हौज-ए-खास, पांगरा आणि धरम तलावांचे सुशोभीकरण करणे, माहिती केंद्र, स्वच्छता गृह, वाहनतळ, पर्यटक निवास, बनी बेगम बाग, खुलताबाद, निजामशाहची कबर, मालोजीराजे भोसले गढी, वेरुळ इ. संरक्षित स्मारकांचे संवर्धन आणि जोपासना या कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा माहूर देवस्थान (नांदेड) पर्यटन विकास आराखडा 21613.00 लाख रुपयांचा आहे. मंदिराकडे जाणारे रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, मंदिर परिसर आणि रस्त्यावर विजेची सोय तसेच भाविकांसाठी शौचालयाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भक्त निवास अशी विकासकामं या निधीतून करण्यात येणार आहेत. माहूर देवस्थान येथील वन विभागाच्या 10 हजार हेक्टरमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. लोणार (बुलडाणा) पर्यटन विकास आराखडा लोणार (बुलडाणा) पर्यटन विकास आराखडा 9346.51 लाख रुपयांचा आहे. दुर्गा टेकडी येथे रिसर्च सेंटर, प्रयोगशाळा, पर्यटक माहिती केंद्र, तारांगण आणि संग्रहालय बांधणे, सरोवराभोवती सुरक्षा कक्ष, पदपथ, व्हुयविंग प्लॅटफॉर्म, सूचनाफलक, प्रदूषणविरहित बसेस आणि परिसर सुशोभीकरण करणे, ऐतिहासिक मंदिरांचे संवर्धन करणे, प्रथमोपचार केंद्र, ध्यानसाधना केंद्र, प्रतीक्षागृह, प्रयोगशाळा आणि सभागृह, शासकीय इमारतीचे रुपांतर, क्लॉक रुम या कामांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : एका बाजुला दुष्काळ! दुसऱ्या बाजुला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईत विमानसेवा विस्कळीत
एका बाजुला दुष्काळ! दुसऱ्या बाजुला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, मुंबईत विमानसेवा विस्कळीत
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
अखेर भोसलेंनी डिफेंडर कार परत नेली; अंतरवालीत पोहोचताच जरांगे पाटलांनी फोन करुन बोलावलं
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
Embed widget