एक्स्प्लोर
कोल्हापुरात आय पॅलेसमध्ये चोरी, 60 आयफोन लंपास

कोल्हापूर : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या आय पॅलेसमधून तब्बल 35 लाखांच्या आय फोन मोबाईलची चोरी झाली आहे. शाहूपुरी परिसरातील पाच बंगला परीसरात हे शोरुम आहे. गेल्या महिन्यात सुरु झालेलं हे दुकान लूटण्यात आलं आहे. या दुकानातून 50 हजार रुपये किमतीचे सुमारे 60 मोबाईल चोरीला गेले आहेत. दिवाळीचा मुहुर्त साधत चोरांनी काल कोल्हापूरातील रेल्वेस्टेशन जवळील आय पॅलेस दुकान साफ केलं. दसऱ्या दिवशी आय पॅलेस हे नविन मोबाईलचं दुकान सुरु करण्यात आलं होतं. पहाटे चारच्या सुमारास दुकानाचं कुलुप तोडून चोरट्यांनी महागडे मोबाईल बॉक्सवेगळे करत लंपास केले आहेत. चोरीचा प्रकार दुकान आणि दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी कोल्हापूर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















