Buldhana News बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी पुढे आली आहे. यात बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात पाणंद रस्त्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे (Congres) जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांनी केलाय. पाणंद रस्त्याच्या विकासकामात 56 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बोंद्रे यांनी केलाय. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी केलीय. या आरोपानंतर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अनेक चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे या आरोपामध्ये कितपत तथ्य आहे आणि पुढे या प्रकरणाची चौकशी केली जाते का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पत्रकार परिषद सुरू असताना भाजपकडून घोषणाबाजी
बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सोमवारच्या सायंकाळी बुलढाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पाणंद रस्त्याच्या विकासकामात 56 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केलाय. ही पत्रकार परिषद काँग्रेस कार्यालयात सुरू असतानाच भाजप कार्यकर्त्यांनी बाहेर येऊन राहुल बोंद्रे यांचे विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना वेळीच पांगविले आणि पुढील अनर्थ टळलाय. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात आता वेगळं वळण प्राप्त झाले असून या प्रकरणी आता नेमकी काय सत्यता पुढे येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सिंदखेड राजा शेगाव भक्ती मार्ग विरोधातले आंदोलन पेटलं
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव या भक्ती महामार्ग विरोधात आता शेतकऱ्यांनीही आक्रमक पवित्रा घेत हे आंदोलन पेटवलंय. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा महामार्ग होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केलं होतं. मात्र, हा महामार्ग तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आलेला आहे. त्यामुळे महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल आहे. हा महामार्ग रद्द झाला पाहिजे, या मागणीसाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील करतवाडी या गावात शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. महामार्गासाठी जमिनी देणार नाही. अशा आशयाची घोषणाबाजी करत शेतकरी टॉवरवर चढूले आहेत.
हे ही वाचा