Prakash Ambedkar: आगामी निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अशातच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आरक्षण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देखील या निवडणुकीसाठीची चाचपणी सुरू केली आहे. या सर्व घडामोडी सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे यांना लक्ष्य केलं आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) सारखा खेळ कोणीही करू शकत नाही. एक तीर मे दो निशान ही साधण्याची कला मनोज जरांगे पाटलांमध्ये आहे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) 288 जागा लढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांनी 288 जागा लढवाव्यात आणि गरीब मराठ्यांना न्याय द्यावा असा टोला प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange) लगावला आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने प्रकाश आंबेडकर मनोज जरांगेवर बोलताना दिसत आहेत.
वंचित कोणासोबत जाणार 7 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणूक वंचित स्वबळावर लढणार की, कोणासोबत आघाडी करणार याबाबतची भूमिका प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) येत्या 7 तारखेला स्पष्ट करणार आहेत. त्याचबरोबर या विधानसभा निवडणुकीत वंतिचचे किती उमेदवार उतरवणार हे देखील 7 तारखेनंतर स्पष्ट करणार असल्याचे प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सांगितले आहे.
जालन्यात संध्याकाळी सहा वाजता प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा.
जालन्यात आज वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव यात्रा दाखल होणार आहे, जालना जिल्ह्यातील जाफराबाद आणि जालना शहरात आज ही यात्रा दाखल होणार आहे, जालना शहरातील मंठा चौफुली येथून या यात्रेला सुरुवात होईल, आणि शहरातील गांधी चमन येथे या यात्रेच रूपांतर सभेत होणार असून, या सभेला प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे संबोधित करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) होम ग्राउंडवरती ही सभा होत असल्याने प्रकाश आंबेडकर नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे