Badlapur Blast News : बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत (Mankivali MIDC) रासायनिक कंपनीत मोठा स्फोट (Big explosion in chemical company) झाल्याची घटना घडली आहे. यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता, की रिऍक्टरचा 100 वजनाचा एक भाग उडून तब्बल 400 मीटर लांब असलेल्या एका घरावर जाऊन कोसळला आहे. या भाग घरात झोपलेल्या एका व्यक्तीच्या पायावर पडल्याने, त्याचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तर या कुटुंबातील लहान मुलीसह तिघे जण जखमी झाले आहेत.


अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट


बदलापूरच्या माणकिवली एमआयडीसीत रेअर फार्मा नावाची कंपनी आहे. त्यात केमिकल्स उत्पादन केलं जातं. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास कंपनीत रिऍक्टरमध्ये प्रक्रिया सुरु असताना अचानक रिसिव्हरमध्ये स्फोट झाला. यानंतर तिथेच असलेल्या मिथेनॉल या ज्वलनशील पदार्थांच्या ड्रम्सने सुद्धा पेट घेतला. त्यामुळे संपूर्ण कंपनी आगीत भस्मसात झाली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की रिऍक्टर सोबत असलेला रिसिव्हर उडून माणकिवली गावातील एका घरावर पडला आहे. यामध्ये तिघेजण जखमी झाले असून यातील एका व्यक्तीच्या पायांना गंभीर इजा झाली आहे. दरम्यान, जखमींना मुंबईच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर एकावर बदलापूरमध्येच उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


स्फोटानंतर कंपनीला आग, कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर घेतली धाव


दरम्यान, स्फोटानंतर कंपनीला आग लागल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. दरम्यान, स्थानिकांकडून आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.


महत्वाच्या बातम्या:


पहाटेच्या सुमारास नागपुरात खासगी कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू तर सहा कामगार जखमी