एक्स्प्लोर

सोलापुरात कर्तव्यावर असताना पोलिसांच्या मोबाईल वापरावर पोलीस आयुक्तांचा 'अंकुश'

कर्तव्यावर असताना मोबाईलवर पाहणे अयोग्य आहे. तरी यापुढे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना कर्तव्य सोडून मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्यास त्यांचेवर 500 रुपये दंडाच्या शिक्षेची कारवाई करण्यात येईल, असे आदेशाद्वारे कळवण्यात आले आहे.

सोलापूर : कर्तव्यावर असताना मोबाईलवर बघणे किंवा मोबाईलवर बोलत बसणे पोलिसांना आता चांगलेच महागात पडणार आहे. सोलापूर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी कामावर असताना कर्तव्य सोडून मोबाईल वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कर्तव्यावर असताना कर्तव्य सोडून मोबाईल वापरल्यास पोलीस कर्मचाऱ्यांना 500 रुपये दंड भरावा लागणार आहे.

सोलापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी, अधिकारी सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यालयीन आदेश काढण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील पोलीस  कर्तव्यावर असताना कर्तव्य सोडून मोबाईल बघत असतात किंवा मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले होते.

कर्तव्यावर असताना मोबाईलवर पाहणे अयोग्य आहे. तरी यापुढे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कर्तव्य बजावत असताना कर्तव्य सोडून मोबाईल वापरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर 500 रुपये दंडाच्या शिक्षेची कारवाई करण्यात येईल, असे आदेशाद्वारे कळवण्यात आले आहे.

सोलापूर आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अंकुश शिंदे यांनी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच कामात कसूर केल्यामुळे एका फौजदारासह 9 कर्मचाऱ्यांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई आयुक्तांनी केली.

दोन दिवसापूर्वी तब्बल 207 पोलिसांच्या बदलीचाही निर्णय त्यांनी घेतला. रात्री 10.30 नंतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही, याबाबत शहरात विशेष काळजी घेतली जात असल्याने आयुक्तांच्या नावाप्रमाणे गुन्हेगारीवर 'अंकुश' ठेवण्यात यश मिळत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BJP Maha Adhiveshan : राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
राज्याचे जाणते राजे, अनेक भावी मुख्यमंत्र्यांना घरी बसवलं; भाजपच्या महाअधिवेशनात महाविकास आघाडीवर घणाघात
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
Embed widget