एक्स्प्लोर
औरंगाबादमध्ये झाडाला लटकल्या साडे दहा लाख रुपयांच्या नोटा

औरंगाबाद : काय रे झाडाला पैसे लागलेत का?, अशा शब्दात तुम्ही उधळपट्टी करणाऱ्याची अनेकवेळा खरडपट्टी काढली असेल. मात्र प्रत्यक्षात तुम्ही झाडाला पैसे लागलेले कधी पाहिले नसतील. पण आज औरंगाबादमधील एन 2 परिसरात चक्क झाडाला पैसे लटकल्याचं पाहायला मिळालं. औरंगबादच्या एन- 2 परिसरात एका झाडाला अक्षरशा नोटा लटकल्या होत्या. मात्र त्या नोटा काढण्याचं धाडस कुणीच केलं नाही. कारण त्या 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा होत्या. सकाळी 11 च्या सुमारास एका अज्ञातानं मैदानामधल्या झाडांवर जुन्या नोटांचे बंडल फेकले. त्यातल्या काही नोटा झाडांवरच लटकत होत्या. झाडाला लटकलेल्या नोटा पाहण्यासाठी मात्र परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, फेकण्यात आलेली रक्कम साडे दहा लाखाच्या घरात होती अशी माहिती मिळते. पोलिसांनी या सर्व नोटा ताब्यात घेतला असून नोटा फेकणाऱ्यांचा शोध सुरु आहे.
Before You Go
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















