एक्स्प्लोर

24 तासात 46 टन प्लॅस्टिकचा ढिग, तुंबलेल्या नाशिकचा ग्राऊंड रिपोर्ट

नाशिक: केदारनाथमध्ये आलेल्या जलप्रलयाची आठवण करुन देणारी परिस्थिती दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये पाहायला मिळाली.  पण नाशिकमध्ये आलेला पूर नैसर्गिक आहे की मानवनिर्मित असा सवाल निर्माण झाला आहे. कारण नाशिक महापालिकेने गेल्या 24 तासात ड्रेनेजमधून तब्बल 46 टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला आहे. या प्लॅस्टिक कचऱ्यामुळेच ड्रेनेज, नाले तुंबले आणि पूरस्थिती भयानक झाल्याचा दावा केला जात आहे. नाशिकमध्ये बुधवारी मुसळधार पाऊस पडला. संपूर्ण नाशिक शहर जलमय झालं होतं. घरात, दुकानांत पावसाचं पाणी शिरलं होतं. रस्त्यांना नद्यांचं स्वरुप प्राप्त झालं होतं. इतकंच काय दुचाकी, चारचाकी वाहनं अक्षरश: पाल्यापाचोळ्यासारखी वाहून जात होती. पावसाळ्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व कामांचा डांगोरा पिटणाऱ्या महापालिकेवर सर्वत्र टीकेची झोड उठली होती. मात्र पावसानंतरच्या 24 तासांत नालेसफाई करताना महापालिकेने ड्रेनेज, नाले, ओढ्यांमध्ये अडकलेला तब्बल 46 टन कचरा गोळा केला. यामुळे महापौरांनी केलेला दावा खरा होता का असा सवाल निर्माण झाला आहे. प्लॅस्टिक कचऱ्यामुळेच नाशिकमधली पूरस्थिती गंभीर झाल्याचा दावा खुद्द महापौरांनी केला होताच, पण पर्यावरणप्रेमींनीही आता हेच म्हटलं आहे. नाशिककर दररोज 3 ते 4 टन प्लॅस्टिक कचरा टाकतात अशी महापालिकेची आकडेवारी सांगते. पर्यावरणप्रेमींच्या म्हणण्यानुसार लग्नाचं जेवण असो की दैनंदिन जीवन, 'यूज अँड थ्रो'च्या नावाखाली प्लॅस्टिक सर्रासपणे वापरलं जातंय. दीड लाख पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि अनेक टन प्लॅस्टिक पिशव्या, वस्तू रोज कचरा म्हणून नाशिककर फेकून देतात. हाच कचरा पुढे जाऊन ड्रेनेज, नाले, ओढ्यांमध्ये अडकतो आणि अतिवृष्टीच्या काळात पाण्याच्या विसर्गाला जागा न मिळाल्यानं पूरस्थिती बिकट होते. शहरीकरणामुळे गोदावरी नदीचा गळा आवळण्यात आल्याची तक्रार वारंवार पर्यावरण प्रेमी करत आहेत. सिमेंट-क्राँकीटीकरण, बांधकामांमुळे नैसर्गिक नद्या नालेही आकूंचन पावले आहेत. सरस्वती, वाघाडी या नद्या गटारीत रुपांतरीत झाल्या आहेत. नागरी वस्ती लोकसंख्या वाढल्यावर ड्रेनेज, नाल्यांची रुंदी वाढली पाहिजे, मात्र ती कमी कमी होत चालली आहे. त्यात आता प्लॅस्टिकचा भस्मासूर उभा राहिला, तर तो नाशिकला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही, ही चेतावनी या बुधवारच्या पावसानं नाशिककरांना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News: शेतकऱ्यांच्या मदतीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य, परवानगीशिवाय रजेवर जाणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश
शेतकऱ्यांच्या मदतीच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य, परवानगीशिवाय परस्पर रजेवर जाणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा; नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना सक्त निर्देश
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार

व्हिडीओ

Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर
Lalbaug Cha Raja Visarjan : लालबाग राजाच्या विसर्जनाला यंदाही विलंब होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Naxal News: मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
मुंबईसह राज्यातील शाळा अन् महाविद्यालयातून नक्षलवादी चळवळींचं जाळं; आत्मसर्पित नक्षली कमांडरचं स्फोटक कबूलनामा, म्हणाला..
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Maharashtra Live blog updates: डहाणू तालुक्यातील तलासरी, धुंदलवाडी मोडगाव भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं
Analogue Paneer Ban : 'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
'अ‍ॅनालॉग पनीर'वर FSSAI देशभरात का बंदी आणतंय? बनावट पनीर खाऊन आरोग्य कसं धोक्यात?
सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'बँकेत राजकारण नको' उदयनराजेंचा इशारा
बँकेत राजकारण नको..., सातारा जिल्हा बँक निवडणुकीसाठी उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Mumbai Accident : महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
महिला कामावरून सुटल्यानंतर घरी निघाली मात्र वाटेत अनर्थ..., टँकरच्या धडकेत 32 वर्षांच्या महिलेचा मृत्यू
Drought : आर्थिक मदतीसाठी पुन्हा 'स्वतंत्र जी.आर.' काढू असे सांगून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : अनिल देशमुख
सरकारनं दुष्काळ जाहीर केला मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत कधी मिळणार याचे स्पष्ट उत्तर दिले नाही : अनिल देशमुख
Maharashtra Election commission SIR: महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
महाराष्ट्रातील SIR मोहीमेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, 'या' कारणासाठी बीएलओ घरी जाऊन कागदपत्रं जमा करणार
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणच्या ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 339 कोटी वितरीत, ऑगस्टचे 1500 रुपये कधी मिळणार?
लाडक्या बहिणींना ऑगस्टच्या 1500 रुपयांची प्रतीक्षा, सामाजिक न्याय विभागाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी 
Embed widget