नंदुरबार : बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात आज (सोमवार) नंदुरबारच्या शहादामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मात्र या ‘बंद’ला काहीसं हिंसक वळण मिळालं आणि रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. तसेच शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. त्यामुळे आक्रमक झालेल्या 4 ते 5 हजार शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच घेराव घातला.
मनमानी पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र आताही शेतकऱ्यांच्या या जमावावर पोलिसांचा लाठीचार्ज होत असल्याची माहिती समजते आहे.
दरम्यान, स्वाभिमानी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी हे उद्या (मंगळवार) शहादामध्ये येणार असल्याने येथील वातावरण आणखी तापलं आहे.
शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
- शेतमालाला हमीभावप्रमाणे खरेदी करण्याची मागणी
- शासनाकडून ठरलेल्या आधारभूत किमतीत ठरलेल्या भावात शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी माल खरेदी करावा
- हमीभावानुसार खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
4 ते 5 हजार शेतकऱ्यांचा शहादा पोलीस स्टेशनला घेराव
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2018 11:37 PM (IST)
बाजार समिती आणि व्यापाऱ्यांच्या विरोधात आज नंदुरबारच्या शहादामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मात्र या ‘बंद’ला काहीसं हिंसक वळण मिळालं आणि रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -