एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 09/04/2018


 

  1. दलित अत्याचाराविरोधातील काँग्रेसचं उपोषण अवघ्या तीन तासांत आटोपलं, तर राजघाटावरील उपोषणाला राहुल गांधी तीन तास उशिराने हजर, उपोषणापूर्वी काँग्रेस नेत्यांनी छोले-भटूरेवर ताव मारल्याचा भाजपचा दावा https://goo.gl/Ku2jYj


 

  1. अहमदनगर शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादीपाठोपाठ भाजप आमदार शिवाजी कर्डिलेही गजाआड, हत्येचा कट रचणाऱ्यांना फाशी द्या, शिवसेना नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार https://goo.gl/o3SJoi


 

  1. ‘राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी षडयंत्र, शिवसैनिकांच्या हत्याकांडात संग्रामचा कुठेही यत्किंचितही संबंध नाही,’ अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया https://goo.gl/LKb9zM


 

  1. रस्ता आणि ब्रीज दुरुस्तीसाठी मुंब्रा-बायपास 16 एप्रिलपासून दोन महिने बंद, दुरुस्तीच्या कामांमुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता https://goo.gl/5Kat26


 

  1. विरार लोकलमध्ये चौथ्या सीटवरुन प्रवाशाला बेदम मारहाण, मारहाणीत प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर दुखापतhttps://goo.gl/3iGPKE


 

  1. सांगलीत महिलेची तीन मुलींसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या, नवऱ्याशी झालेल्या भांडणातून महिलेचं टोकाचं पाऊल https://goo.gl/mWQhPh


 

  1. शड्डू ठोकणार, थेट भिडणार… अखिलेश यादव वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढण्याची शक्यता https://goo.gl/fjgyaH


 

  1. भारताची सीमा ओलांडून चिनी सैन्याची लडाखजवळील उत्तर पेंगाँग भागात 6 किलोमीटरपर्यंत घुसखोरी, भारतीय जवानांच्या विरोधानंतर चिनी सैन्य माघारीhttps://goo.gl/VfWyrr


 

  1. पत्नी म्हणजे वस्तू किंवा जंगम मालमत्ता नाही, तिच्यावर इच्छेविरुद्ध सोबत राहण्याची जबरदस्ती नको, सुप्रीम कोर्टाने पतीला सुनावलं https://goo.gl/QQRSpn


 

  1. 2015 चे IAS टॉपर टीना दाबी आणि आयएएस अतहर आमीर-उल शफी विवाहबंधनात, काश्मिरमधील पहलगाममध्ये विवाह सोहळा संपन्न https://goo.gl/mchFru


 

  1. सीरियामध्ये रासायनिक शस्त्रांचा हल्ला, हल्ल्यात 80 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती https://goo.gl/SHtyFy


 

  1. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ प्रेषित मोहंमद पैगंबरांची थेट वंशज, मोरोक्कोतील वर्तमानपत्रात इतिहासकारांचा दावा https://goo.gl/Jdm4AJ


 

  1. ‘मलाही कॉम्प्रमाईजच्या ऑफर आल्या होत्या, ‘माझा विशेष’मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचा धक्कादायक खुलासा, मराठी सिनेसृष्टीतही कास्टिंग काऊच जुनाट रोग https://goo.gl/mLLQj9


 

  1. 'मी फुकट खेळेन, ऑस्ट्रेलियासाठी काहीही करण्यास तयार', संघाची घडी पुन्हा बसवण्यासाठी माजी कर्णधार मायकल क्लार्क सरसावलाhttps://goo.gl/viSbhJ


 

  1. जीतू रायला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एअर पिस्टल नेमबाजीचं सुवर्ण; टेबल टेनिस-बॅडमिंटनमधल्या सांघिक यशानं भारताच्या सुवर्णपदकांची संख्या दहावर https://goo.gl/7SfHV6


 

BLOG : भारतीय हेरगिरीचा इतिहास, समीर गायकवाड यांच्या #हेरगिरी मालिकेतील अखेरचा ब्लॉग https://goo.gl/thKjRY

माझा विशेष : नगरचा नरक कुणी केला? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता फक्त   एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा