पुणे : मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक श्रीमती शकुंतला प्रभाकरराव देशपांडे - मांडवेकर यांचे काल (दि.८ एप्रिल) रोजी पुण्यात निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. अनंत, अभय व अजय असे तीन मुलगे व सौ. स्नेहल ही विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. राज्यातील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या त्या मातोश्री होत.
प्रकृती बिघडल्याने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरु होते. मात्र, काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमती शकुंतला देशपांडे यांनी हैदराबाद संस्थान मुक्तीलढ्यात आपले बंधू स्व. व्यंकटराव खळीकर यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतलेला होता. कळंब शहरातील सामाजिक, धार्मिक उपक्रमांत त्यांचा नेहमी पुढाकार असे.
स्वातंत्र्यसैनिक शकुंतला देशपांडे यांचे पुण्यात निधन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2018 10:01 PM (IST)
मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक श्रीमती शकुंतला प्रभाकरराव देशपांडे - मांडवेकर यांचे काल (दि.८ एप्रिल) रोजी पुण्यात निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -