नितीन गडकरींच्या विरोधातलं दुसरं नाव म्हणजे नितीन राऊत. नितीन राऊत दलित चेहरा.. काँग्रेसच्या राज्यात मंत्रिपदही सांभाळलं. त्यामुळे राऊत मैदानात उतरले तर दीक्षाभूमी विरुद्ध संघभूमी असा सामना रंगू शकतो. कधीकाळी गडकरींमुळे भाजपचा झेंडा खांद्यावर घेणारे नाना पटोले आता गडकरींविरोधात शड्डू ठोकून तयार आहेत.
केंद्रातलं मोदी सरकार शेतकरी आणि ओबीसी विरोधात आहे, असा आरोप करत नाना पटोलेंनी भाजपला जय श्रीराम केला. आणि पुन्हा स्वगृही म्हणजे काँग्रेसमध्ये परतले, त्यामुळे नागपूरमधून गडकरींना पराभूत कऱण्यासाठी पटोले उत्सुक आहेत.
गडकरींच्या विरोधातला चौथा इच्छूक उमेदवार म्हणजे आशिष देशमुख. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे चिरंजीव. 2014 मध्ये काटोल मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर लढले आणि राष्ट्रवादीचे नेते आणि काका अनिल देशमुख यांचा पराभव केला. पण स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरुन त्यांचं भाजपसोबत बिनसलं आणि आता त्यांनी काँग्रेसची वाट धरलीय.
आता गडकरींविरोधात ते लढण्यासाठी का इच्छुक आहेत. “काकांचा पराभव केला. आता गडकरी काकांचा पराभव करु”, असा टोला आशिष देशमुख यांनी लगावला.
काँग्रेसचे चार-चार नेते विरोधात लढण्यासाठी सज्ज असताना गडकरींनी चौघांना मिळून एक नवं आव्हान दिलंय.
चौघांनी मिळून माझ्याविरोधात लढलं तरीही हरकत नाही, स्वत:चं महत्व वाढविण्यासाठी हा खेळ सुरु आहे, असा प्रतिहल्ला गडकरींनी केला.
2014 साली काँग्रेसकडून विलास मुत्तेमवार मैदानात असताना नितीन गडकरी जवळपास तीन लाखांच्या फरकानं विजयी झाले. अर्थात त्यावेळी मोदींची लाटही होती. यंदा गडकरींसमोर गल्यावेळच्या तुलनेत मोठं आव्हान असणार आहे. आता गडकरी ते कसं पेलणार आणि चौघांपैकी काँग्रेस कुणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं आहे.
खरं तर ज्या पद्धतीचे राजकीय पोलरायझेशन देशात करण्याचा प्रयत्न सध्या होतो आहे, त्यात नुसती भाजपाच्या विरोधात मोट बांधली जात नाही, तर ती मोट आहे संघाच्या विरोधात. त्यामुळेच फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लढत म्हणून नाही, तर संघ विचारधारेचे उगमस्थान म्हणून नागपूरचा विरोधक उमेदवार महत्वाचा राहणार आहे.