एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उस्मानाबादच्या नळदुर्ग किल्ल्यावरील तलावात बोट बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू
उस्मानाबादमधील नळदुर्ग किल्ल्यावरील तलावात एक बोट बुडून 3 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबादमधील नळदुर्ग किल्ल्यावरील तलावात एक बोट बुडून 3 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. एकूण नऊ जण बोटिंग करत असताना अचानक बोट उलटली. बोटीतील तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे, तर एकाचा अद्याप शोध सुरु आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचादेखील समावेश आहे.
सध्या सुट्ट्यांचे दिवस सुरु आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून पर्यटक उस्मानाबादच्या नळदुर्ग किल्ल्याला भेट देतात. दोन वर्षांपूर्वी किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यात आले. त्यावेळी या किल्ल्यावर बोटींग सुरु करण्यात आले. आज 9 जण एका बोटीने बोटिंग करत होते. त्यावेळी त्यांची बोट उलटली, या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे.
व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement