3 January Headlines : नायगाव(खंडाळा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात आज राज्यात ठिकठिकाणी आंदोनं करण्यात येणार आहेत. भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन आज नागपुरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार आहे. यासह आज दिवसभरातील घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत.
भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन
भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन आज नागपुरात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्यात व्हर्चुअली सहभागी होणार आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री नरेंद्र सिंह आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण तसेच सतत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञान असे यंदाच्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा विषय आहे.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
नायगाव(खंडाळा) येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त नायगाव या जन्मस्थान असलेल्या गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडे आठ वाजता दिंडीला छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर आयोजित सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, अतुल सावे उपस्थिती लावणार आहेत.
बारामतीत अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्याकृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्याकृषी प्रदर्शनाचे आज उद्घाटन होणार आहे. 3 ते 18 तारखेपर्यंत नवउद्योजकांसाठी (स्टार्ट अप) या प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले. कृषि प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी 19 ते 23 जानेवारी दरम्यान खुले असणार आहे. 170 एकरावरती याचे आयोजन करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर रणवीर चंद्रा व डॉक्टर अजित जावकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार उपस्थित राहतील.
निवासी डॉक्टरांच्या संपाचा दुसरा दिवस
मार्ड निवासी डॉक्टरांचा संप सुरूच राहणार आहे. पंधरा दिवसात निवासी डॉक्टरांच्या मागण्याबाबत सकारात्मक पाऊलं उचलली जातील, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिलेला असताना सुद्धा मार्ड निवासी डॉक्टरांचा संप सुरूच आहे. राज्यभरातील 7 हजार डॉक्टर या संपात सहभागी आहेत.
अजित पवारांच्या विरोधात आंदोलन
विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या विरोधात आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन करण्यात येणार आहे.
चेंबूर येथे भव्य मोर्चा
मुंबई मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पांजरपोळ चेंबूर येथे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
रत्नागिरीत अजित पवारांविरोधात आंदोलन
छत्रपती संभाजी महाराजांबाबत अजित पवार यांनी केलेल्या विधानाविरोधात भाजपकडून संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे.याच कसब्यामध्ये छत्रपती संभाजी राजे यांना मुघलांचा सरदार मुकर्रबखान याने धोक्याने कैद केलं होतं. त्यामुळे भाजपच्या या आंदोलनाला महत्व असेल.
मुंबईत अंगणवाडी सेविकांचे आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन
अंगणवाडी सेविकांचे आज आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन होणार आहे. सावित्रीबाईंचा मुखवटा घालून धरणे आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलनावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा मुखवटा धारण करून मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत धरणे आंदोलन केले जाणार आहे.