सांगली : 17 एटीएममध्ये पैसे भरण्याचा ठेका असणाऱ्या दोन कामगारांनी 3 कोटी 33 लाख 39 हजार रुपये हडपल्याचा प्रकार सांगली जिल्ह्यातील अनेक बँकाच्या बाबतीत घडला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


आशपाक बैरागदार आणि लियाकत खान या दोन कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे दोघेजण जिल्हातील 17 बँकांच्या मुख्य शाखेतून एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी नेत होते. मात्र प्रत्यक्षात एटीएममध्ये ते पैसे भरतच नसल्याचं समोर आलं.

500 आणि 1000 च्या नोटा चलणातून रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी नोटा बदलून देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र अशात एवढी मोठी अफरातफर ही धक्कादायक बाब मानली जात आहे.