सोलापूर : सोलापुरात विद्यार्थी सेनेकडून नोटाबंदीचा अनोख्या पद्धतीनं निषेध करण्यात आला. पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर उभ्या असलेल्या नागरिकांना झंडू बामचं वाटप करण्यात आलं.


पैशांसाठी तासनतास रांगेत उभं राहिल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना पाय आणि कंबरदुखीचा त्रास होतो आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी विद्यार्थी सेनेने हे आंदोलन केलं. सरकारचा निर्णय नागरिकांसाठी कसा त्रासदायक ठरतोय हेच या आंदोलनातून सांगण्यात आलं.

काळ्या पैशाविरोधीतल लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी लोकांनी बँकांबाहेर अक्षरश: रांगा लावल्या आहेत. तासनतास लोक बँकांबाहेर रांगेत उभे राहताना दिसत आहेत.