25 March In History : आजकाल वृत्तपत्रे सर्वत्र जाहिरातींनी भरलेली आहेत आणि या जाहिराती वृत्तपत्र मालकांच्या कमाईचा एक मोठा स्रोत आहेत. अशातच अनेकांना असा प्रश्न पडला असेल की पहिली जाहिरात कधी आणि कुठे प्रसिद्ध झाली असेल. तर याचं उत्तर आहे भारतात 25 मार्च 1788 रोजी भारतीय भाषेतील पहिली जाहिरात कलकत्ता गॅझेटमध्ये (Calcutta Gazette) प्रसिद्ध झाली होती. ही जाहिरात बांगला भाषेत प्रसिद्ध झाली होती.
1914: अमेरिकन कृषी शास्त्रज्ञ व हरित क्रांतीचे जनक नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग यांचा जन्मदिन.
नॉर्मन अर्नेस्ट बोरलॉग हे अमेरिकन कृषीशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते होते. ज्यांना हरित क्रांतीचे जनक मानले जाते. बोरलॉग हे नोबेल शांतता पारितोषिक, प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम आणि काँग्रेसनल गोल्ड मेडल मिळालेल्या पाच लोकांपैकी एक आहेत. नॉर्मन बोरलॉग यांनी कृषी विज्ञानातील आधुनिक तंत्रांचा शोध लावला, ज्यामुळे गव्हाची उत्पादकता 700 पटीने वाढली. यासोबतच त्यांनी हे तंत्र संपूर्ण जगासोबत मोफत शेअर केले. जेणेकरून सुमारे एक अब्ज लोकांचे जीवन उपासमार होण्यापासून वाचवता आले. बोरलॉग यांना 2006 मध्ये पद्मविभूषण, भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांनी त्यांना 1968 मध्ये सितारा-ए-इम्तियाझ पुरस्कार प्रदान केला. 1968 मध्ये त्यांची इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंगचे मानद सदस्य म्हणून निवड झाली. बोरलॉग यांना 1978 मध्ये बांगलादेश बोटॅनिकल सोसायटी आणि बांगलादेश असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे पहिले मानद सदस्य बनवण्यात आले. या व्यतिरिक्त त्यांना आणखी किमान 48 सन्मान मिळाले आहेत आणि हे अशा देशांनी दिले आहेत, ज्यांच्या सामान्य नागरिकांना बोरलॉगच्या कार्याचा एक प्रकारे फायदा झाला आहे.
1932: प्रख्यात लेखक व पु काळे यांचा जन्मदिन (V P kale)
वसंत पुरुषोत्तम काळे, हे मराठी भाषेतील लेखक होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी 60 पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची आणि ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत. ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे 1,600 पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. त्यामध्ये सखी, तप्तपदी हे कथासंग्रह वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. 26 जून 2001 रोजी मुंबई येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं राहत्या घरात निधन झाले.
2020 : देशात कोरोनामुळे तामिळनाडूमध्ये पहिला मृत्यू
आजच्याच दिवशी देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या 600 च्या वर गेली आणि कोरोनामुळे तामिळनाडूमध्ये पहिल्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
देशाच्या आणि जगाच्या इतिहासात 25 मार्च या तारखेला नोंदवलेल्या इतर महत्त्वाच्या घटनांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
1807: ब्रिटिश साम्राज्यातून गुलामगिरीचा अंत.
1821: ग्रीक स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात.
1896: ग्रीसची राजधानी अथेन्स येथे आधुनिक ऑलिंपिक खेळ सुरू झाले.
1898: स्वामी विवेकानंदांनी भगिनी निवेदितांना ब्रह्मचर्याची दीक्षा दिली.
1920: स्वातंत्र्यसेनानी आणि गांधीवादी नेत्या उषा मेहता यांचा जन्म.
1931: थोर पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचे निधन.
1986: देशातील पहिली विशेष दुधाची ट्रेन आनंदहून कलकत्त्याला पोहोचली.
1989: भारतातील पहिला सुपर कॉम्प्युटर राष्ट्राला समर्पित करण्यात आला. X-MP-14 अमेरिकेने विकसित केले आहे.