25 March Headlines : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.  राहुल गांधी आज पत्रकार परिषदेत घेणार आहेत. तर राज्यभर भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपकडून हे आंदोलन केलं जाणार आहे. राज्यभर भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपकडून हे आंदोलन केलं जाणार आहे. एक नजर आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर...


राहुल गांधींची पत्रकार परिषद 


दिल्ली – काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांची दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.  खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी देशासाठी लढतोय, कोणतीही किंमत चुकवण्याची तयारी अशा आशयाच ट्विट केल होतं. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. तर आमच्या धमन्यांमध्ये शहिदांच रक्त आहे... सरकार घाबरतय म्हणून सगळ शडयंत्र रचल जातयं... काल झालेल्या AICC च्या बैठकीनंतर प्रियंका गांधींनी संतप्त प्रतिक्रिया दिली. 


राहुल गांधींच्या विरोधात भाजपचे आंदोलन -


राज्यभर भाजपच्या वतीनं राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजपकडून हे आंदोलन केलं जाणार आहे... राहुल गांधींनी भारताला, ओबीसी समाजाला बदनाम केलं आहे, असं म्हणत भाजपचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात भाजपकडून हे आंदोलन केल जाणार आहे.  विधानभवन परिसरातही भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडूनही आंदोलन केले जाणार आहे.  
 
काँग्रेस संतप्त, आंदोलन करणार - 


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत... आज राज्यात विविध ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे.  राहुल गांधी यांच्यावर कारवाई केल्यानंतर काँग्रेस संतप्त झाली आहे... त्यामुळे राज्यभरामध्ये काँग्रेसची आंदोलन सुरू राहतील. त्याचसोबत काँग्रेस आमदार विधानभवनात आक्रमक राहणार आहेत. काळी फीत बांधून ते कामकाजात सहभागी होतील, त्याचसोबत राहुल गांधीवर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करतील. काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सकाळी 11:30 वाजता भाजपच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत. 


 अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस -


मुंबई – राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अनेक मुद्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.  विरोधकाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरती कायदा व सुव्यवस्था यावरून सरकारवरती मोठ्या प्रमाणावर टीका केलेली आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तर दिलं जाणार आहे. यावेळी ठाकरे सरकारच्या काळातही झालेल्या घटनांचा संदर्भ दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरून मोठ्या प्रमाणावरती सभागृहात वाद होण्याची शक्यता आहे. 


293 अन्वये मुंबईच्या विकासावरती चर्चा करताना विरोधकांनी अनेक आरोप सत्ताधारी पक्षावरती केलेले आहेत. सत्ताधारी आमदारांनी मागील सरकारच्या काळातील निर्णयावर आरोप केलेले आहेत. या सर्वांवर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. त्यामुळे याही ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळतील. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांच्या चर्चेविना लोकायुक्त बिल विधानसभेमध्ये पास झाल्यानंतर आज विधान परिषदेमध्ये लोकायुक्त सुधारित बिल मांडण्यात येणार आहे. या बिलाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला भ्रष्टाचार विरोधी लोकपाल विधेयकाच्या कक्षात आणण्याची शक्यता आहे... असं करणार महाराष्ट्र हे एकमेव राज्य असणार आहे.


मनसेची पत्रकार परिषद - 


पुणे - काल रद्द झालेली मनसेची पत्रकार परिषद आज सकाळी 11 वाजता होणार आहे.  पुण्येश्र्वर आणि नारायनेश्र्वर या दोन पुरातन मंदिराच्या बाबत मनसेने केलेल्या मागण्या आणि कार्यवाहीची माहिती पत्रकार परिषदेत देणार आहेत.या पत्रकार परिषदेमध्ये मनसेने केलेल्या कायदेशीर गोष्टीची माहिती देण्यात येईल.


मुंबई – मॅजेस्टीक आमदार निवास या इमारतीच्या नुतनिकरणासाठी भुमिपूजन आणि कामाचा शुभारंभ सकाळी 9.30 वाजता होणार आहे... मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधानपरिषदेच्या उपसभापती, दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते यावेळी उपस्थित रहातील .  


मानवी साखळीचे आयोजन -
सांगली -  कृष्णा नदीच्या  प्रदूषणाविरुद्ध मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले आहे.  सकाळी 8 वाजता आयर्विन पुलापासून आंदोलनाला सुरूवात होणार आहे... समस्त सांगलीकर यावेळी रस्त्यावर येतील आणि एक मोठा मानवी साखळी करतील... आयर्विन पुलापासून सुरु होईल आणि शहरातील हरभट रोड, गणपती पेठ, कापडपेठ व्यापून टाकेल.... ही साखळी महापालिकेपर्यंत असेल. सामान्य नागरीक, व्यापारी, फेरीवाले, रिक्षावाले, हमाल, विद्यार्थी, महिलांसह सर्व घटकांनी त्यात सहभागी होणार आहेत . 


दोन्ही राऊत मालेगावमध्ये -
नाशिक -  संजय राऊत, विनायक राऊत मालेगाव मुक्कामी... रविवारी उद्धव ठाकरेंच्या होणाऱ्या सभेच्या आयोजनांसाठी दोन्ही राऊत मालेगावमध्ये तळ ठोकून आहेत... यावेळी ते बैठका घेणार, सभास्थळाची पहाणी करणार आहेत... यांच्यासह सुषमा अंधारेसह इतर नेते ही येण्याची शक्यता आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नटाकच्या दौऱ्यावर -
बेंगळुरु – पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नटाकच्या दौऱ्यावर आहेत. मोदींच्या हस्ते मधुसूदन साई इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज एंड रिसर्च सेंटरच उद्घाटन... त्यानंतर मोदी मेट्रो लाईनच उद्घाटन करतील... सकाळी 10.45 वाजता मोदी कर्नाटकात पोहचतील.


भोपाल/रायपुर – केंद्रिय गृहमंत्री अमित शाह छत्तीसगढ आणि मध्य प्रदेश दौऱ्यावर... 


लखनऊ – योगी सरकारच्या दुसऱ्या टर्मच आज एक वर्ष पुर्ण होत आहे... त्यानिमीत्त योगी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतील.


दिल्ली – बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सीबीआयकडून आज चौकशी होणार आहे.  सकाळी 10.30 वाजता तेजस्वी यादव सीबीआय कार्यालयात पोहचतील... लॅंड फॉर जॉब घोटाळा प्रकरणी ही चौकशी होणार आहे.


जळगाव - राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते धरणगाव तालुक्यातील चींचपुरा येथे पाणी पुरवठा योजनेसह विविध विकास कामांचा दुपारी 4 वाजता शुभारंभ होणार... यावेळी जाहीर सभा होणार असून गुलाबराव पाटील यांच्या सोबत भाजप आमदार मंगेश चव्हाणांचीही उपस्थिती असेल...