23rd June Headlines: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौऱ्याचा आज तिसरा दौरा आहे. आज विविध कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. आज बिहारची राजधानी पाटणामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आगामी 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी....
पालखी सोहळा
- संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नातेपुते मुक्कामी असणार आहे. तर संत तुकाराम यांची पालखी सराटी मुक्कामी असणार आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आज तिसरा दिवस
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा कालचा दिवस सर्वात महत्वाचा होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान मोदीमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमात हजेरी लावणार आहे.
2024 साठी विरोधी पक्षाची बैठक
आज पाटणामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढाकाराने देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल हे महाराष्ट्रातले नेते उपस्थित राहणार आहेत. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, एम के स्टालिन उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
सातारा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात आहे.
पुणे
- अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत. विरोधी पक्षनेते पदाऐवजी पक्ष संघटनेत जबाबदारीची इच्छा व्यक्त केल्यानंतर अजित पवार पहिल्यांदा पुण्यात येत आहेत.
सोलापूर
- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज जिल्हा दौऱ्यावर आहेत.
नंदुरबार
- जिल्हा अमली पदार्थ मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज 5000 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 'अमली पदार्थ मुक्त दिवस' साजरा केला जाणार आहे.
परभणी
- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची बैठक आज परभणीत होणार आहे. संपर्कप्रमुख अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत हि बैठक होणार आहे. या आधी दोन वेळा ही बैठक रद्द करण्यात आली होती.
चंद्रपूर
- मोदी @9 निमित्त केंद्रीय वनमंत्री भुपेंद्र यादव आजपासून तीन दिवसाच्या चंद्रपूर दौऱ्यावर येत आहेत.
मुंबई
- समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी.
- केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आज मुंबईच्या दौऱ्यावर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच बैठक करणार आहेत.
- भारतीय फार्मास्युटिकलकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला केंद्रीय आरोग्यमंत्री उपस्थित राहणार आहे.