एक्स्प्लोर

23 December Headlines: जयंत पाटील यांच्या निलंबनावरून राजकारण तापणार, राज ठाकरेही आज नागपुरात

23 December Headlines: हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार आहे.

23 December Headlines: हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं आहे. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार आहे. आज राज्यभरात युवक काँग्रेस पार्टीतर्फे निषेध आंदोलन केले जाणार आहे. राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

आज राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर येत आहेत. संघटनात्मक बांधणी आणि पदाधिकाऱ्यांची नेमणूक असं त्यांच्या दौऱ्याचं उद्दिष्ट आहे. सकाळी 10 वाजता नागपुरात त्यांचं आगमन होईल. त्यानंतर सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका आहेत. राज ठाकरे सकाळी 7 वाजता त्यांच्या मुंबईतील घरातून निघणार आहेत.

आमदार मुक्ता टिळकांवर आज अंतिम संस्कार

आमदार मुक्ता टिळक यांचे पार्थिव सकाळी 9 ते 11 या कालावधीत पुण्यातील केसरी वाड्यात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधी होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे अनेक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हिंगोली: स्वाभिमानी शेतकरी संघटने कृषी अध्यक्ष कार्यालयावर मोर्चा 
 
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी अध्यक्ष कार्यालयावर शेकडो शेतकरी घेऊन मोर्चा काढला जाणार आहे. पिक विमासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर सहभागी होणार असून गोरेगावपासून ते हिंगोली पर्यंत रविकांत तुपकर आणि शेतकऱ्यांच्या गाड्यांचा ताफा येणार आहे. पोलिस हा ताफा अडवण्याची शक्यता आहे,  दुपारी 1 वाजता. 

मराठा सेवा संघच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात

परभणी- मराठा सेवा संघच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आज शोभायात्रा व ग्रंथदिंडी चे आयोजन करण्यात आले आहे.  दुपारी 3 वा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ही शोभा यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेत छत्रपती शिवरायांचा सजीव देखावा, छत्रपती शिवरायांची मूर्ती, हलगी पथक,घोडेस्वार, लेझीम पथक, वारकरी, वासुदेव, गोंधळी बॅन्ड सहभागी होणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य किसान सभेची आज पदयात्रा 
 
वर्धा- महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी ते नागपूर पदयात्रा करत शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांकरिता संघर्ष दिंडी पदयात्रेचं आयोजन करण्यात आले आहे. आज वर्धा जिल्ह्यातील बरबट्टी येथून निघत ही पदयात्रा नागपूर विधानभवनवर जाणार आहे. या पदयात्रेत अनेक शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत, सकाळी 10 वाजता.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Maharashtra Live News Updates: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आज संघर्ष मोर्चा
Maharashtra Live News Updates: सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आज संघर्ष मोर्चा
Gokul Election 2026: सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
सरकारच्या अध्यादेशाला गोकुळच्या काँग्रेसप्रणीत पॅनेलचं आव्हान, आज कोर्टात सुनावणी; दुसरीकडे कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वात संघर्ष मोर्चा
Dharashiv Fire Incident News: धाराशिवमध्ये घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा गुदमरुन मृत्यू, किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारं कुटुंब मृत्युच्या खाईत
धाराशिवमध्ये घराला लागलेल्या आगीत सहा जणांचा गुदमरुन मृत्यू, किराणा दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणारं कुटुंब मृत्युच्या खाईत

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Western Railway Mumbai Local Train Updates: विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
विरार-नालासोपारा फटाक्यांमुळे भूमिगत केबल जळाली; सिग्नल यंत्रणेत बिघाड, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Old Monk Rum Latest Marathi News: 5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
5 महिन्यांपासून बंदी असलेल्या Old Monk च्या विक्रीचा मार्ग खुला, पण नेमकं काय बदलणार?; पाहा A टू Z माहिती
Fire News:कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
कुठे फटाक्यांमुळे तर कुठे शॉर्ट सर्किट... दिवाळीला राज्यात भीषण अग्नितांडव; मुंबई, ठाण्यापासून ते नागपूर चंद्रपुरपर्यंत असंख्य आगीच्या घटना, मोठी वित्तहानी
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Eknath Shinde Thane Fire: ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
ठाण्यातील इमारतीला भीषण आग लागली, एकनाथ शिंदे बॅटरी घेऊन आत शिरले, फायरब्रिगेडच्या जवानांना विचारलं, 'तो पोरगा यंग आहे ना?'
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Embed widget