22nd June Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात महत्त्वाची चर्चा होणार आहे. त्याशिवाय पंतप्रधान मोदी अमेरिकन संसदेला संबोधित करणार. बुधवारी ईडीने मुंबई महापालिका अधिकारी आणि शिवसेना ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांच्या निवासस्थानी छापे मारले. त्यानंतर आज चौकशी होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी...



पालखी सोहळा 


- संत ज्ञानेश्वरांची पालखी आज बरड मुक्कामी असणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फलटण मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेणार आहेत. 
- संत तुकारामांची पालखी आज इंदापूर मुक्कामी असणार आहे. इंदापूर येथे गोल रिंगण होणार आहे. 
- संत गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर शहरात आगमन होणार आहे. आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर दक्षिण सोलापुरातील उळेगावात पालखीचे मुक्काम असेल. त्यानंतर सोलापूर शहरात सकाळी पालखीचे आगमन होईल. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याचा आज दुसरा दिवस


- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार
- मोदी आज अमेकिन काँग्रेस (संसद) च्या संयुक्त सत्राला संबोधित करणार आहेत.
- जो बायडन यांच्या बरोबर मोदी रात्रीचं भोजन करतील.


अहमदनगर 


- दर्शना पवार हिची हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करा या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यलयावर मोर्चा काढण्यात येणार आहे


सातारा


-  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढचे तीन दिवस दरेगावात असणार आहेत.


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रम, पक्षाच्या बैठकीला हजेरी लावणार आहे. 
 
 पुणे


- यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव यशस्विनी सन्मान सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित रहाणार आहेत. यावेळी शबाना आझमी, जावेद अख्तर उपस्थित रहाणार आहेत, 


- रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात दुग्ध विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दूध दर प्रश्नासंदर्भात बैठक होणार आहे.
 


सोलापूर 


- गजानन महाराजांच्या पालखीचे आज सोलापूर शहरात आगमन होणार आहे. आज सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर दक्षिण सोलापुरातील उळेगावात पालखीचे मुक्काम असेल. त्यानंतर सोलापूर शहरात सकाळी पालखीचे आगमन होईल. दरवर्षी शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर पालखीचे स्वागत करत असतात. मात्र मागील दोन वर्षांपासून प्रशासनातर्फे पालखीचे स्वागत केले जात आहे.
 
 
 हिंगोली 


- लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण जिल्हा दौऱ्यावर आहेत. 
 


मुंबई 
 
- जुन्या पेन्शनसह अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी महासंघासाठीच्या संयुक्त विचारविनिमय समितीची मंत्रालयात महत्वाची बैठक होणार आहे. 


- समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या कारवाईविरोधात हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. 


- साल 2008 च्या मालेगाव ब्लास्ट प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्यात. शेवटच्या साक्षीदाराची साक्ष नोंदवली जाणार. 


- येस बँक घोटाळा प्रकरणी सीबीआय आणि एसीबीनं दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी.