एक्स्प्लोर

निवडणुकीच्या काळात सांगलीतून 20 धारदार तलवारी हस्तगत, गुंडविरोधी पथकाची कारवाई

गुंडविरोधी पथकाचे प्रमुख संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली. लोकसभा निवडणूक काळात तलवारींचा हा साठा सापडल्याने अटकेतील दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यातून आणखी गंभीर माहिती मिळण्याची शक्यता आहे.

सांगली : ऐन निवडणुकीच्या काळात सांगलीच्या वाळवामधून 20 धारदार तलवारी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सांगली पोलीस दलातील गुंडविरोधी पथकाने ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या तलवारीची किंमत जवळपास 40 हजार रुपये आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. गुंडविरोधी पथकाचे प्रमुख संतोष डोके यांच्या पथकाने ही कारवाई केली. लोकसभा निवडणूक काळात तलवारींचा हा साठा सापडल्याने अटकेतील दोघांची कसून चौकशी सुरु आहे. यातून आणखी गंभीर माहिती मिळण्याची शक्यता आहे. सोमनाथ दिनकर पाटील आणि हणमंत काकासाहेब जाधव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी बेकायदा हत्यार बाळगणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी रात्री जिल्ह्यात ‘आपरेशन आलआऊट’ मोहिम राबविण्यात आले. या मोहिमेत गुंडविरोधी पथक सहभागी झालं होतं. त्याचवेळी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके यांना वाळवा येथे सोमनाथ पाटील व हणमंत जाधव यांच्याकडे तलवारींचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती मिळाली. पथकाने मध्यरात्री दोघांच्या घरावर छापा टाकला. दोघांच्या घरांची झडती घेतली असता 20 धारदार तलवारी सापडल्या.  या तलवारी आनलाईन मागविल्या असल्याची माहिती आरोपींनी दिली असून  प्रत्येक एक तलवार त्यांना एक हजार रुपयाला मिळाली होती. पुढे ते दोन हजार रुपयाला एक तलवार विकणार होते, अशी माहिती तपसातून पुढे आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Maharashtra Live Breaking Marathi News: नाशिक शहरात खड्ड्यांमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य; म्हणाल्या, 'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसाच....
'जसा समृद्धी हायवेवर एक्झिट असतो तसा माझ्या राजकारणातही वेळोवेळी एक्झिट असेल'; मंत्री पंकजा मुंडेंचं राजकीय निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य
Abhijeet Dipke : अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
अमित शाह असताना जर परदेशातून फंडिंग होत असेल तर हे कसले चाणक्य? अभिजीत दिपकेंचा टोला
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget