एक्स्प्लोर
नागपूरात दोन मुलींचा कालव्यात बुडून मृत्यू
नागपूर : नागपूर जिल्हातील मौदा परिसरात दोन मुलींचा कालव्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेली मुलींची आई थोडक्यात बचावली आहे.
नागपूरच्या मौदा तालुक्यात ही घटना घडली आहे. खात या गावातील प्रगती डहाके (12) आणि साक्षी डहाके (8) या मुली आईसोबत कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कालव्यावर कपडे धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे.
आज दुपारी 2 वाजता ही घटना घडली आहे. बुडणाऱ्या मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या आईला ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत वाचवलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement