नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सोयापेंड आयातीचा कुठलाही विचार केंद्राकडे विचाराधीन नसल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी पीयूष गोयल यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. सोयापेंडच्या आयातीमुळे देशातील सोयाबीनचे दर पडणार असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त झाली होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.


केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. भारतातील पोल्ट्री उद्योगासाठी खाद्य म्हणून वापरली जाणारी सोया पेंड आयात करण्याचा कोणताही विचार नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राच्या कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी सोयाबीन उत्पादकांची समस्या केंद्र सरकारकडे मांडली. त्यानंतर गोयल यांनी हा निर्णय जाहीर केला. सोयापेंडच्या आयातीमुळे देशातील सोयाबीनचे दर पडणार असल्याची चिंता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.


 






वाशिममध्ये दर घसरल्याने सोयाबीन उत्पादक संतप्त
दरम्यान, वाशीमच्या कारंजा बाजार समितीमध्ये आज  बाजार समिती उघडताच  सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी चांगलेच संतप्त झाले. त्यांनी आक्रमक होऊन बाजार समितीचा  लिलाव बंद पाडला. सोमवारी सोयाबीनला 7200 रुपये प्रति क्विंटल दर  होता. मंगळवारी मात्र 6400 रुपये दराने लिलाव होत असल्याने सोयाबीनची आवक जास्त होत असल्याने शेतकऱ्यांची व्यापारी आडते लूट करत असल्याचा आरोप करत बाजार समितीमध्ये ठिय्या  मांडला. पोलीस महसूल प्रशासनाने हस्तक्षेप केल्याने दर वाढून मिळाल्याने पुन्हा तीन तासानंतर बाजार समितीमध्ये लिलाव सुरु झाले. 


संबंधित बातम्या :