मुंबई: नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय फैसला सुनावणार आहे. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक सध्या कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. यासह दिवसभरातील इतर महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे,


एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावर


उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. दौऱ्याची सुरूवात आज ठाण्यापासून होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता टीप टॉप प्लाझा मध्ये मुख्यमंत्री कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत. 14 जुलैला कोल्हापूर शहरात पेटला मैदान येथे होणार जाहीर सभा होणार आहे, तर पुण्यात सकाळी मेळावा होणार आहे. तर 15 तारखेला नवी मुंबई येथे विष्णुदास भावे नाट्यगृहात होणार कार्यकर्ता मेळावा होणार आहे. 


भाजपच्या सर्व आमदार-खासदारांची आज बैठक


भाजप सर्व आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकारी यांची बैठक भिवंडी येथे आयोजित करण्यात आलीय. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यत ही बैठक होणार असून, या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत. सध्या आमदारांमध्ये सुरू असलेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची बैठक आहे.


नागपूर – नागपूर मेट्रो रिझनच्या आता मध्ये येत असलेल्या गोंडखैरी कोळसा खाणच्या उत्खननाची परवानगी आधी पर्यावरण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी ठेवली आहे. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. या प्रकल्पाच्या अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रात वेणा जलाशय, राष्ट्रीय महामार्ग, अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्ट्री आणि नागपूर शहारा लागतच निमशहरी भाग येतो. त्यामुळे आजच्या जनसुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा कोळसा खाण पट्टा अडाणी समूहाला मिळाला आहे. 
 
रत्नागिरी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता - चिपळूण येथे आगमन, सकाळी 10.30 वाजता - स्वातीश्रद्धा अपार्टमेंट मार्कंडी चिपळूण कार्यालयाचे उद्घाटन. सकाळी 11 वाजता - अतिथी हॉल चिपळुण येथे रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी-कार्यकर्ता बैठक. दुपारी 3 वाजता - लोटे परशुराम येथील तलावाचे शुशोभीकरण कार्यालयाचे उद्घाटन. संध्याकाळी 6.30 वाजता - वैश्यभवन हॉल खेड येथे पक्ष प्रवेश होणार आहेत. 
 
बीड – मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर धनंजय मुंडे आज पहिल्यांदा परळीत येणार आहेत. कड्यापासून परळीपर्यंत होणार जोरदार स्वागत केलं जाणार आहे. गहिनीनाथगडावर धनंजय मुंडे दर्शनासाठी जातील. त्यानंतर परळीत जाहिर सभा होणार आहे. 
 
पंढरपूर – कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी...म्हणत आपल्या कर्मालाच आपला देव मानणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीला खुद्द विठुराया आज अरणकडे प्रस्थान ठेवणार आहे. आषाढी एकादशीसाठी सर्व संतांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांना घेऊन विठूरायाच्या भेटीला पंढरीकडे येत असतात. मात्र विठुराया स्वतः फक्त संत सावता माळी यांच्या भेटीसाठी अरणकडे जाण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. आपल्या काळ्या मातीतच सावळ्या विठुरायाला पाहणारे संत सावता माळी कधीच पंढरीला गेले नाहीत. पण सावता माळी यांची निस्सिम भक्ती पाहून स्वतः पांडूरंग त्यांच्या भेटीसाठी अरणला गेल्याची अख्यायिका आहे. आज सकाळी देवाच्या पादुका अरणकडे प्रस्थान ठेवतील. 
 
मुंबई – नवाब मलिकांच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय सुनावणार फैसला. वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक सध्या कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत. ईडीनं गोवावाला कंपाऊंड जमीन खरेदीविक्री प्रकरणी मलिकांविरोधात मनी लाँड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
दिल्ली –आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि युएई दौऱ्यावर आहेत. 13 आणि 14 जुलैला मोदी पॅरेस मध्ये असतील. 14 जुलैला बॅस्टिड डे परेड मध्ये सहभागी होतील. 15 जुलैला मोजी अबू धाबीला जातील तिथे द्विपक्षीय चर्चा होणार आहे. मोदी दुपारी 4 वाजता पॅरेसला पोहचतील, संध्याकाळी 7.30 वाजता सिनेट अध्यक्षांबरोबर बैठक, रात्री 8.45 वाजता फ्रान्सचे पंतप्रधान यांच्यासोबत सीन म्युजिकल कार्यक्रम.
 
चंद्रयान 3 – 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता चंद्रयान 3 चं लॉचिंग होणार आहे. इस्त्रो कडून लॉचिंग साठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. चंद्रयान 3 ला LVM – 3 हे रॉकेट घेऊन जाणार आहे.
 
आजच्या सुनावण्या - 


माहिती-तंत्रज्ञान (आयटी) नियमांतील दुरूस्तीला हास्यकलाकार कुणाल कामराकडूनं दिलं गेलेलं आव्हान योग्य आहे, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयानं ते सुनावणीकरता दाखल करून घेतलं आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. निला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. सरकारविरोधात समाज माध्यमांवरून प्रसिद्ध होणाऱ्या खोट्या बातम्या ओळखण्याचा केंद्र सरकारला अधिकार देणाऱ्या कायद्यातील दुरूस्ती आवश्यक कशी आहे? अशी विचारणा न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आणि प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेत.


राज्यातील एस.टी.आरक्षपासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे, यावर मुंबई उच्च न्यायालयात येत्या 13, 14 आणि 20 जुलै रोजी नियमित सुनावणी होणार आहे. काळेकर समितीनं साल 1956 मध्ये दिलेल्या अहवालानुसार राज्यात ‘धनगड’ जातीचा उल्लेख निर्माण झाला आहे. एवढ्याच पुराव्याच्या आधारावर राज्यातील धनगर समाज आरक्षणापासून वंचित आहे. मात्र देशातील एकाही संस्थेकडे ‘धनगड’ संवर्गातील घटक राज्यात वास्तव्यास असल्याचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या अनेक दशकांपासून यासंदर्भात पुरावे जमा करुन या याचिका दाखल केलेल्या आहेत, त्यावर आज सुनावणी होईल.