एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोबाईलवर गेम खेळू न दिल्याने पुण्यातील 13 वर्षीय मुलाची आत्महत्या
दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी पालकांनी मोबाईल देणं बंद केलं होतं.
पुणे : गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून एका 13 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. धनकवडीतील गणेशनगर भागात हा प्रकार घडला. दर्शन मनिष भुतडा असं या मुलाचं नाव असून त्याने सोमवारी (31 डिसेंबर) संध्याकाळी राहत्या घरी कमरेच्या पट्टयाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्याची आई बँकेचं कलेक्शन करते तर वडील खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतात. दर्शन भुतडा हा आठवीमध्ये शिकत होता. दर्शनला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी पालकांनी मोबाईल देणं बंद केलं होतं.
31 डिसेंबरला दर्शन घरीच होता. आईने त्याला अभ्यासाला बस, असं सांगितलं. पण तो अभ्यास न करता मोबाईल घेऊन बसला होता. यामुळे आईने त्याला मोबाईलवर गेम खेळू नको, अभ्यास कर असं खडसावले. ही बाब सहन न झाल्याने दर्शनने मोबाईल ठेवून दिला आणि उठून खोलीत निघून गेला. बराच वेळ झाला तरी खोलीतून काहीच आवाज न आल्याने आईने खोलीत जाऊन पाहिले. त्यावेळी दर्शनने कमरेच्या पट्टयाने गळफास घेऊन आत्महत्याचं दिसून आलं.
सहकारनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
निवडणूक
Advertisement