एक्स्प्लोर
बारावीची परीक्षा अवघड गेल्याने तरुणीची आत्महत्या
पुणे : बारावीची परीक्षा अवघड गेल्याने पुण्यातील तरुणीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पिंपळसुटी येथे राहणाऱ्या प्रियंका चंद्रकांत पोखरकर या 18 वर्षीय तरुणीने आत्महत्या केली.
प्रियंका शिरुरमधील रयत शिक्षण संस्थेच्या उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत कॉमर्समध्ये शिकत होती.
प्रियंकाने मार्च महिन्यात बारावीची परीक्षा दिली होती. मात्र, परीक्षा अवघड गेल्याने निकालाची तारीख जवळ येत असल्याने ती मानसिक तणावाखाली वावरत होती. याच तणावातून प्रियंकाने टोकाचं पाऊल उचललं.
राहत्या घरातील स्वयंपाक खोलीत पंख्याला अडकवणाऱ्या हुकाला दोरी बांधून गळफास लावला आणि प्रियंकाने जीवनयात्रा संपवली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement