मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार  होताना  दिसत आहे. रविवारी राज्यात  127 रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील  एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 646 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात गेल्या 24 तासात 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही


गेल्या चोवीस तासात राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 372  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 98, 66, 301 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 


राज्यात सध्या  646 अॅक्टिव्ह रुग्ण 


राज्यात सध्या 646 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 349 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 42 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


देशात गेल्या 24 तासांत नवीन 1150 कोरोना रुग्णांची नोंद


देशात कोरोना संसर्गबाधितांच्या संख्येत आज वाढ झाल्याचे दिसून आले. देशात मागील 24 तासात कोरोना विषाणूचे 1150 नवीन बाधितांची नोंद करण्यात आली. तर, चार संसर्गबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून 11 हजार 558 इतकी झाली आहे. या महासाथीमुळे प्राण गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 751 इतकी झाली आहे. 


संबंधित बातम्या


Coronavirus Updates : देशात मागील 24 तासात 1150 बाधितांची नोंद, चार संसर्गबाधितांचा मृत्यू


Corona Update : चिंताजनक! दिल्लीत कोरोना रूग्णांमध्ये वाढ, 20 फेब्रुवारीनंतर सर्वात जास्त संख्या