Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  1 मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेआधीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानाचे बुकिंग केले आहे. राज ठाकरे यांनी आपल्या  "राज"नीति चा नमुना सादर केला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यातील सभेच्या वेळी झालेली पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न औरंगाबादमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. 


मनसेची उत्तर सभा ठाण्यामध्ये झाली. ठाण्यात काही लोकांनी मैदान मिळू दिलं नाही असा आरोप मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केला, याचीच पुनरावृत्ती औरंगाबादमध्ये होऊ नये याची काळजी आम्ही घेतल्याचे त्यांनी सांगितलं. मनसे कार्यकर्त्याने घोषणा यापूर्वीच औरंगाबादेतील मराठवडा संस्कृतिक मंडळाचे मैदान एक तारखेच्या सभेसाठी बुक करून ठेवलं होतं. त्यासाठीची आवश्यक रक्कमदेखील जमा करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. 


मैदान मिळाले पण...


मनसेच्या कार्यकर्त्यांनी सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान बुक केले असले तरी त्यांना पोलीस परवानगीची आवश्यकता भासणार आहे. मनसेने अद्याप पोलीस परवानगीसाठी अर्ज केला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे मैदान मिळाले असले तरी पोलीस परवानगीसाठी मनसेला प्रयत्न करावे लागणार आहेत. 


सभेसाठी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान का?


राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. याच मुद्द्याचा या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा एक इतिहास आहे. सन 2005 मध्ये औरंगाबादच्या या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची सभा सुरू होती. सभेदरम्यान अजान झाली. त्यावेळी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण बंद केलं नव्हतं. उलट, बाळासाहेब ठाकरे यांनी अजानला जोरदार विरोध केला होता.


याच मैदानावरून 11 मे 1988 रोजी औरंगाबादचे नाव संभाजीनगर अशी घोषणा बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर शिवसेना आणि समविचारी पक्ष औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगरच करत आहेत. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर काही शासकीय परिपत्रकावर, जीआरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे.


बाळासाहेबांची सभा आणि संस्कृतिक मंडळाचं नात फार जुनं आहे. कारण आज वरच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्व सभा याच मैदानात झाल्या. बाळासाहेब ठाकरे यांच्या या मैदानावरील गर्दीचा इतिहास आजवर कोणीही मोडू शकले नाही..


इतर महत्त्वाच्या बातम्या: