12 February Headlines: दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. तर, पुण्यातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू होणार आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाचा आज मुंबईत उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जाणून घेऊयात आज दिवसभरात...
दिल्ली
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. गुरुग्राम जिल्ह्यातील अलीपूरगाव ते राजस्थानच्या दौसा असा 220 किलोमीटरचा महामार्ग तयार आहे. दिल्ली ते दौसा हा प्रवास सध्या 6 तास लागतात परंतू या महामार्गामुळे साधारण अडीच तासात हा प्रवास होणार आहे. महामार्ग पूर्ण तयार झाल्यानंतर मुंबई-दिल्ली प्रवास सहा तासात पूर्ण होणार आहे.
- हिंदवी स्वराजाचा विजय उत्सव आज महाराष्ट्र सदनात केला जाणार आहे. या कार्यक्रमाला ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित रहाणार आहेत.
मुंबई
- काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील आज मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. राज्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. काँग्रेस विधीमंडळ नेतेपदावरून बाळासाहेब थोरात यांनी राजीनामा दिल्यानंतर एच.के. पाटील यांची थोरात यांच्यासोबत बैठक होणार आहे.
- शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने उत्तर भारतीयांचा मेळावा घेण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची मते निर्णायक ठरणार आहेत. स्वत: उद्धव ठाकरे हे या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.
- आदित्य ठाकरे विभागवार पदाधिकाऱ्यांचे मेळावे घेत आहेत. अंधेरीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रंगशारदा होणार आहे.
- हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी समूहाने केलेला गैरव्यवहार जगासमोर आल्यानंतर सुद्धा केंद्रातील भाजप सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे आम आदमी पार्टी आज मुंबईत केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणार आहेत. चर्चगेट स्टेशन ते नरिमन पॉईंट येथील भाजप मुख्यालय येथे मोर्चाचे आयोजन
वाशिम
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पोहरादेवी येथे असणार आहेत. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील विकास कामाच्या भूमीपूजनाकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्री उपस्थित रहाणार आहेत. यावेळी बंजारा समाजाचे प्रतीक असलेल्या नंगारा भवनासमोर संत सेवालाल महाराज यांचा 11 फुटी पंचधातू अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केलं जाणार आहे.
वर्धा
- वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनजागरण यात्रेचा समारोप आज होणार आहे. जनजागरण यात्रेचा समारोप जाहीर सभेने होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, सुबोध मोहिते उपस्थित रहाणार आहेत.
परभणी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारकरी साहित्य परिषदेच्या 11 व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत.
बीड
- परळीमध्ये कार अपघातात जखमी झाल्यानंतर उपचार घेऊन बरे झालेले धनंजय मुंडे पहिल्यांदाच परळी शहरात येत असल्याने गोपीनाथ गडावरून त्यांची रॅली निघणार आहे.
ठाणे
- ठाण्यातील राष्ट्रवादीला आज खिंडार पडणार आहे. ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे एकनाथ शिंदे यांच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक असणार आहेत.
पुणे
- चिंचवड पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार आहे. मोरया गोसावी गणपतीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ होईल.
- भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांचा हस्ते उद्घाटन, सकाळी 10 वाजता.
- मविआ बंडखोर राहुल कलाटे प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
- भाजपचे कसबा पेठचे उमेदवार हेमंत रासने आणि कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांची पदयात्रा होणार आहे.
नाशिक
- वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेल्या दरवाढीच्या निषेधार्थ कुसुमाग्रज स्मारकात ग्राहक पंचायत आणि विज ग्राहक समिती आंदोलन करणार आहे.
परभणी
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने एमएसपी परिषदेचे आयोजन केले असून राजू शेट्टी उपस्थित रहाणार आहेत.
भंडारा
- मंत्री सुधीर मुनंगटीवार आज जिल्हा दौऱ्यावर आहेत. साकोली येथे होणाऱ्या भटके विमुक्त कल्याणकारी परिषदेला (बिऱ्हाड परिषद) उपस्थित रहाणार आहेत.
गोंदिया
- मंत्री सुधीर मुनंगटीवार जिल्हा दौऱ्यावर आहेत. तिरोडा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
इतर
बेंगळुरू
- 13 तारखेपासून सुरू होणाऱ्या 14 व्या 'एअरो इंडिया शो'चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.